राजेंद्र पाटील राऊत
नाशिक(घोटी) येथील व्हर्टिकल फार्मिंग नवउद्योजकासाठी प्रेरणादायी
नाशिक – सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल नाशिक ब्युरो चीफ नाशिक येथील ए. एस. ॲग्री अँड अँक्वा समुह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहे. या दरम्यान ऍग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस सेंटर (ओझर) येथील विद्यार्थ्यांनी तेथे भेट दिली व तेथील संपूर्ण नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला. त्यासाठी त्या बॅचचे तुषार आहिरे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. येथे कमी जागेत जास्त उत्पादन कसे घेता येईल हे समजते ,व मत्स्यपालन उत्पादन व मार्गदर्शनही दिले जाते. कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा हा प्रकल्प उल्लेखनीय आहे. अशाच प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल . त्यावेळी त्या पॉलीहाऊस मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या हळद,भुईमुंग,जवस इतर ओषधी वनस्पती व मत्स्यपालन अशा विविध पिकांवर व प्रकल्पांवर करण्यात आलेल्या प्रयोगांची तेथील संचालक मंडळातील श्री. हाडोळ यांनी यावेळी माहिती दिली.यादरम्यान ए.एस. अॅग्री समुहाचे मुख्य संचालक प्रशांत झाडे, साईनाथ हाडोळ, संदेश खामकर, शिरीष पारकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




