• Home
  • प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्ष पदी नागेश गुगे वाड यांची निवड..

प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्ष पदी नागेश गुगे वाड यांची निवड..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210218-WA0046.jpg

प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्ष पदी नागेश गुगे वाड यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्षपदी नागेश मारोती गुगेवाड यांची निवड करण्यात आली असून भारतीय संविधानवर विश्वास ठेवून समाजवाद धर्मनिरपेक्षता व लोकशाही आणि भारताचे प्रभुत्व राजकीय तसेच सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मान्य केल्याने आपली प्रहार जनशक्ती पक्षाच्या एकलारा सर्कल उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे .प्रहार जनशक्ती पक्षाचे मूखेड तालुका अध्यक्ष शंकर दादा वडेवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे जाहूरकर , पत्रकार रंजीत जामखेडकर, अनिल घायाळे सलगरकर सोशल मीडिया तालुकाध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment