Home गडचिरोली नेताजी का फुटबॉल प्रतियोगिता म्हणजे एक उत्सवच आमदार डॉ देवरावजी होळी

नेताजी का फुटबॉल प्रतियोगिता म्हणजे एक उत्सवच आमदार डॉ देवरावजी होळी

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0129.jpg

नेताजी का फुटबॉल प्रतियोगिता म्हणजे एक उत्सवच

आमदार डॉ देवरावजी होळी                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आ.डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते नेताजी कप फुटबॉल प्रतियोगीतेचे उद्घाटन

नेताजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ सुभाषग्राम च्या वतीने 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत होणार फुटबॉलचे सामने

बंगाली गावातील परिसरात फुटबॉल प्रतियोगितेला प्रचंड प्रतिसाद व नागरिकांमध्ये उत्साह

नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाषग्राम च्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट ह्या दरम्यान चालणारी प्रतियोगिता म्हणजे हा एक मोठा उत्सव असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नेताजी कप फुटबॉल प्रतियोगितेचे उद्घाटन प्रसंगी केले.

नेताजी कप फुटबॉल प्रतियोगितेचे सुभाषग्राम येथे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस चालणाऱ्या या प्रतियोगितेमध्ये या परिसरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह असतो . पावसामध्येही हा उत्साह अजिबात कमी न होता त्यात आणखीनच वाढ होताना दरवर्षी दिसून येते. या प्रतियोगितेचे उद्घाटन 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी निखिल भारत बंगाली समन्वय समितीचे उपाध्यक्ष दीपक हलदार , ओम साई कन्स्ट्रक्शनचे सुनील मंडल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शिल्पा राय, बंगाली आघाडीचे अध्यक्ष सुरेशजी शहा महामंत्री सुशांत जी रॉय, आकूलीताई विश्वास तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, ज्येष्ठ नेते जयराम यांचे सह नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाष ग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते , व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

दिनांक १५ ऑगस्ट २२ ऑगस्ट या दरम्यान या बंगाली भागातील परिसरामध्ये या प्रतियोगिते संदर्भात प्रचंड उत्सुकता असते. दरवर्षी साजरा करण्यात येणारी क्रीडा स्पर्धा हा एक मोठा उत्सव म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.

Previous articleसंघर्षनगरातील(स्नेहनगर) समस्यांचे लवकरच निवारण करणार– भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे
Next articleआसखेडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here