Home सामाजिक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनविशेष —

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनविशेष —

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_074718.jpg

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनविशेष —

मातृभाषा’ म्हणजे तर सामाजिक जीवनाची पहिली पायरीच

निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

१७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस “आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी काही क्षण खर्च करून दुसऱ्या भाषेतील ज्ञान आपल्या मातृभाषेत आणले पाहिजे.मातृभाषा दिवस साजरा करणे हे भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि जगातील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे आहे. 2008 मध्ये भाषा आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा आंतरराष्ट्रीय आई भाषा दिवस या शब्दाचा उच्चार केला.युनेस्कोने जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’, बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.भाषा हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय, आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त एक संपर्काचे माध्यम’ इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक महत्व मानवी भाषेला आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे. मातृभाषा’ म्हणजे तर सामाजिक जीवनाची पहिली पायरीच.एका विशिष्ट समूहाशी मातृभाषा आपले नाते जोडून देते. आजूबाजूच्या परिसरातून मिळणाऱ्या ज्ञानाला, सौंदर्याला, आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा होय. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो.

सौ उमा (जयश्री) चव्हाण
आदर्श शिक्षिका – छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव

Previous articleपहेला येथे संविधान रॅलीचे स्वागत
Next articleमराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here