Home नाशिक पिंगळवाडे येथे कारगिल विजय दिन साजरा.

पिंगळवाडे येथे कारगिल विजय दिन साजरा.

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0023.jpg

पिंगळवाडे येथे कारगिल विजय दिन साजरा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
1999 यावर्षी कारगिल या परिसरात झालेल्या भारत-पाक युद्धात वीरमरण आलेल्या सर्व शहीद जवानांना पिंगळवाडे येथे मानवंदना देण्यात आली.
कारगिल या विजय दिनाच्या अौचित्याने पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली व शहीद जवान अमर रहे च्या घोषात घोषणा दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा प्रांगणात ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन केदा भामरे यांनी अर्पण केला.तसेच गावातील नागरिक गंगाधर भामरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास नारळ वाढवण्यात आले. तसेच वीर जवान कुलदीप नंदकिशोर जाधव यांच्या स्मारकास पुष्पहार वीर माता नीता जाधव व वीर पिता नंदकिशोर जाधव यांनी मानवंदना देत पुष्पहार अर्पण केला. व शहीद कुलदीप जाधव या वीर हुतात्म्याच्या आठवणी शालेय विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आपल्या सुंदर अशा मनोगतातून व्यक्त केले.
या कारगिल युद्धात आपली मोलाची कामगिरी बजावणारे पिंगळवाडे येथील माजी सैनिक उत्तम शिवराम भामरे यांनी युद्धकाळात घडलेल्या बहुतांश घटनांवर आपल्या आठवणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमोर मांडल्या तसेच त्यांनी शहीद जवानांना मानवंदना देत आपले मनोगत व्यक्त केले. उत्तम भामरे यांच्याबरोबर पिंगळवाडे येथे बागलाण तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे पदअधिकारी उपस्थीत होते. त्यात भीवसन कापडणीस,दीपक कापडणीस,संदीप भामरे, जितेंद्र भामरे, उत्तम भामरे,महेश गांगुडेॅ,किरण सावकार, नसरुदिन शेख,व विरपत्नी कल्पना रौंदळ.
उपस्थित होते. याप्रसंगी संजय भामरे, कृष्णा भामरे,नानाजी बागुल, केवबा भामरे, गणेश बोरसे, सुनील भामरे, सचिन भामरे, दीपक भामरे, धर्मराज भामरे, जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे यांचे शिक्षक, शिक्षकेत्तर ,कर्मचारी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleखासदार सांगा उद्धव साहेबांचे काय चुकलं?
Next articleमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या प्रयत्नांना, बातम्यांना व सततच्या पाठपुराव्याला यश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here