Home नांदेड माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या प्रयत्नांना, बातम्यांना व सततच्या...

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या प्रयत्नांना, बातम्यांना व सततच्या पाठपुराव्याला यश.

141

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0022.jpg

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या प्रयत्नांना, बातम्यांना व सततच्या पाठपुराव्याला यश.

▪️बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब काॅलीनी पर्यंतच्या रस्त्याला होणार लवकरच सुरुवात ; नालीचे काम सुरू
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
किनवट : शहरातील गोकुंदा येथील बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब काॅलीनी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा आणि त्याच रस्त्यावरील देवस्थान एकवीरा मंदिर व कोचिंग क्लासेस समोर जो पाण्याचा ढव साचत होता, या बद्दल च्या बातम्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या लिखाणातुन विविध वृत्तपत्रांमध्ये सहा महिन्यांपासून सातत्याने प्रसिद्ध होत होत्या. शेवटी प्रशासकांनी या सर्व बातम्यांची नोंद घेऊन येथील कामास सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोकुंदा येथील बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब काॅलीनी पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयणीय अवस्था झालेली होती, नागरीकांना व विद्यार्थ्यांना त्या रस्त्यावरुन जाण्यासाठी गटारीच्या घाण पाण्यातुन व खड्यातुन जावं लागतं होते, या बाबतच्या पुष्कळ बातम्या सहा महिन्यांपासून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या लिखाणातुन विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येत होत्या, तसेच ते गोकुंदा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि गोकुंदा व किनवट बांधकाम विभाग येथील अभियंता यांना सतत सहा महिन्यांपासून या रस्ता व नाली बद्दल पाठपुरावा करत होते, या सर्वांची नोंद घेऊन शेवटी सहा महिन्यांनंतर, बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब काॅलीनी पर्यंतच्या सिमेंट चा पक्का रस्ता व एकवीरा देवी मंदिर च्या बाजुने पक्की नाली मंजूर झाली आहे. आणि नालीच्या कामास देखील सुरुवात झाली आहे व रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
सदरील भागात अनेक कोचिंग क्लासेस असुन या क्लासेस साठी येणारे लहाण मुले अनेक वेळा या खड्ड्यात पडून त्यांना दुखापत झाली होती. तसेच वृद्ध महिला-पुरुष, वाहनधारक, पादचारी यांना या रस्त्याने चालने ही मुश्कील झाले होते. सदरील समस्या लक्षात घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्याध्यक्ष आशिष शेळके यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उचलला हे विशेष.

Previous articleपिंगळवाडे येथे कारगिल विजय दिन साजरा.
Next articleमराठा सेवा संघ गडचिरोली च्या वतीने राज कोहळे चा सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.