Home गडचिरोली मराठा सेवा संघ गडचिरोली च्या वतीने राज कोहळे चा सत्कार.

मराठा सेवा संघ गडचिरोली च्या वतीने राज कोहळे चा सत्कार.

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0021.jpg

मराठा सेवा संघ गडचिरोली च्या वतीने राज कोहळे चा सत्कार.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// चामोर्शी तालुक्यातील 50 घरे असणाऱ्या राजनागट्टा ह्या लहानश्या गावातील राज कोहळे यांची NIT (राष्ट्रीय प्राद्योगिक संस्था) आंध्र प्रदेश मध्ये  उच्च शिक्षणाकरिता निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ गडचिरोलीच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक बांदूरकर,  माजी जिल्हाध्यक्ष  दादाजी चापले, गोविंदराव बानबले, दादाराव चुधरी, पांडुरंग नागपुरे, शेषराव येलेकर, राजेंद्र उरकुडे, चंद्रकांत शिवणकर, त्र्यंबक करोडकर, पुरुषोत्तम म्हस्के, राज चे मोठे बंधू अनुप कोहळे उपस्थित होते.
अतिसामान्य कुटुंबातील आलेल्या राज चे वडील वसंत कोहळे व आई कविता कोहळे दोघेही सामान्य शेतकरी आहे. परंतु ह्या सर्व परिस्थिती ला मागे टाकत राज ने जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर कठोर परिश्रम घेऊन 10 वी 92%, 12वी 94% आणि त्यानंतर JEE mains मध्ये 96% मिळवले त्या आधारावर त्याची NIT आंध्र प्रदेश करिता निवड झाली. या निवडीचे श्रेय राज यांनी आई, वडील, मोठे भाऊ, सर्व मार्गदर्शक गुरु यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here