Home गडचिरोली कारगिल युद्धामध्ये बलिदान देणाऱ्या विर जवानांचा अभिमान–माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे

कारगिल युद्धामध्ये बलिदान देणाऱ्या विर जवानांचा अभिमान–माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे

138

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0025.jpg

कारगिल युद्धामध्ये बलिदान देणाऱ्या विर जवानांचा अभिमान–माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे

शहरातील कारगिल चौक येथे प्राणाची आहूती देणाऱ्या विर जवानांना केले अभिवादन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

१९९९ मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धामध्ये भारताच्या शुर सैनिकांनी कारगिल द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला.पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिल मधुन हुसकावून लावले. युद्धादरम्यान ३००० हुन अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले.मातृभूमीचे रक्षण करतांना ५००हुन अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले.या ऑपरेशन विजयमध्ये बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा अभिमान आहे.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.
आज कारगिल विजय दिवसानिमित्य शहरातील कारगिल चौक येथे प्राणाची आहूती देणाऱ्या वीर जवानांना दिप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या.
यावेळी नप मुख्याधिकारी विशाल वाघ,भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गोविंद सारडा,सुनीलजी मेहर,डॉ. बिडकर, महेंद्र वाघमारे,देशमुख,राजेंद्र साळवे,अंकुश भालेराव,वासुदेव बट्टे,विलास नैताम,सोनटक्के, आशिष पठाण,सुनील बावणे,प्रफुल आंबोरकर,नरेंद्र चन्नावार,प्रकाश भांडेकर,विवेक बैस उपस्थित होते.

Previous articleमराठा सेवा संघ गडचिरोली च्या वतीने राज कोहळे चा सत्कार.
Next articleभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या ED चौकशी च्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.