Home कोल्हापूर खासदार सांगा उद्धव साहेबांचे काय चुकलं?

खासदार सांगा उद्धव साहेबांचे काय चुकलं?

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0028.jpg

खासदार सांगा उद्धव साहेबांचे काय चुकलं?

कोल्हापूर राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क :हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेतील बंडखोर खासदार धैर्यशील माने कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील शेकडो शिवसैनिकांनी मोर्चा काढला. खासदार माने यांच्या घरावर मोर्च्या मधील प्रमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त दाखल करण्यात आला.
शिवसेनेचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. बाजार समिती इथून सुरुवात झालेल्या या मोर्चा मध्ये शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांचा मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मोर्चा रोखला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठे झटपट आणि धक्काबुक्की झाली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं.
. दरम्यान काही शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे,संजय पवार करीत आहेत. मोर्चाला शिवसेनिकांनी उपस्थिती लावताना खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. खासदार माने यांचा गद्दार असा उल्लेख करत गली गली मे शोर है माने चोर है अशाही घोषणा देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब माने यांचा नातू असाल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. माने गटाने दोन वेळा गद्दारी केल्याचे सांगून तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. मात्र माने दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दारला क्षमा नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
. शिवसैनिकांनी खासदार धर्यशील मानेवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी तुम्हाला लोकसभेत पाठवलं. प्रवक्ते पद दिलं. मातोश्री वर गेल्यावर उद्धव साहेबांनी सन्मान दिला. हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वतःच्या घरातील भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं. ओ खासदार सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं. अशी विचारणा यावेळी करण्यात आली.

Previous articleद्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
Next articleपिंगळवाडे येथे कारगिल विजय दिन साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here