Home नांदेड श्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रातोळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन …

श्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रातोळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन …

128

आशाताई बच्छाव

IMG-20230207-WA0067.jpg

श्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त
रातोळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन …

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड – जिल्हा भरात प्रसिद्ध असलेली रातोळी येथील श्री. रोकडेश्वर ची यात्रा आहे ती प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री. रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवात सात दिवशीय किर्तन सप्ताह सोहळा, नयनरम्य आतिषबाजी, पालखी, गणगवळण, भारुड जंगी कुस्त्यांचा फड यासह लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रातोळी येथील रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन यंदा दि. ३० जाने. ते दि. ७ फेबुवारी या काळात ही यात्रा संपन्न होत आहे. या काळात विविध नामवंत किर्तनकाराची मेजवानी तसेच दि. 5 फेब्रुवारी रोजी पालखी मिरवणुक, नयनरम्य आतिषबाजी व दि. 6 फेब्रुवारी रोजी काल्यांचे किर्तन व जंगी कुसत्यांचा फड इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या यात्रा महोत्स्वातून परिसरातील नागरिकांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यकमांची मेजवानी रातोळीकर यांच्या अथांग प्रयत्न व सेवा सहकार्याने मिळत असते. या यात्रेत भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी रातोळी व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे
दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लोककला व लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोककला व लावणी या कला आविस्कारातुन नवोदीत कलाकारांना एक व्यासपीठ तयार करून देण्याचा आगळावेगळा उपक्रम रातोळीकर गेल्या अनेक वर्षापासून निरंतरपणे जोपासित आहेत.

लोककला व लावणी महोत्सव रातोळी यात्रेच मुख्य आकर्षण असल्यामुळे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत लोककला व लावणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर यांनी दिली.
जंगी कुस्त्यांचा फड आदी कार्यक्रम आयोजित केले. या यात्रा महोत्सवातून परिसरातील नागरिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रातोळीकर त्यांच्या प्रयत्ना व सेवा सहकार्याने मिळत असते. या यात्रेत भाविक भक्तांनी सहभाग व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी रातोळीसह समस्त गावकरी मंडळींनी केली आहे.

Previous articleसांगवी फाटयाजवळ एसटी बसला अपघात २७ प्रवासी जखमी
Next articleमुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः डॉ. संजय लाखे पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.