Home जालना मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः...

मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः डॉ. संजय लाखे पाटील

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230207-WA0071.jpg

मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक
मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः डॉ. संजय लाखे पाटील
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ‘वडीकाळा’ ग्रामस्थासोबत
जालना (दिलीप बोंडे) ः मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या विषयावर दि. 27 जानेवारी रोजी वडीकाळा ग्रामस्थ आणि मनोज जरंगे पाटील यांच्या दरम्यान चर्चा झाली. मात्र या चर्चे दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही तोडगा निघाला नसला तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी दि. 4 फेबु्रवार रोजी दुपारी 05 वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अंबड तालुक्यातील वडीकाळा या गावातील आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि ईतर काही समन्वयकांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात काहीच ठोस निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी वडीकाळा येथील ग्रामस्थांनी लावून धरली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही न्याय्य भूमिका ग्रामस्थांची असून ही मागणी सरकारने मंजूर करावी अशी मागणी सकल मराठा समाजाची ‘जनभावना’ ओळखून शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस भूमिका घेवून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी भूमिका घ्यावी अशी अशी मागणी मराठा समाजबांधवांनी केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शनिवारी दि. 4 फेबु्रवार रोजी दुपारी 05 वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अंबड तालुक्यातील वडीकाळा या गावातील आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि ईतर काही समन्वयकांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक पार पडली. या बैठकीत काहीही निर्णय न झाल्यामुळे मनोज जरंगे पाटील आणि काही तरुणांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून ग्रामस्थांच्या पाठींब्याने कालपासून उपोषण देखील सुरू केले आहे. या आंदोलनात मनोज जरंगे पाटील किंवा एकटे ग्रामस्थच नसून मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाज हा वडीकाळा ग्रामस्थांच्या बरोबर या आंदोलनात असून या आंदोलनाला पुर्ण पाठींबा देखील देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चा, सकळ मराठा समाज आणि मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे, जातीनिहाय जनगणना, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजभवनामध्ये भव्य स्मारक, कोपरर्डीच्या भगिनींना न्याय आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात समाजाचा लढा तिव्र करण्यासाठी लवकरच औरंगाबाद येथे राज्यव्यापी ‘गोलमेज परिषदेचे’ आयोजित करून वडीकाळा ग्रामस्थांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे. उद्यापासून मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना आणि पदाधिकारी, समन्वयक हे वडीकाळा येथे जाऊन या न्याय आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी होणार असून आंदोलनाला अधिकचा पाठिंबा देण्यासाठी मनोज जरंगे पाटील त्यांचे सहकारी, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तातडीने आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेमध्ये पुढील नियोजन केले जाणार असून वेळप्रसंगी राज्यभर तिव्र आंदोलन देखील छेडले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी दिला आहे.
मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना पदाधिकारी आणि समन्वयकांनी वडीकाळा येथे उद्यापासून होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील, जगन्नाथ काकडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ, संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष गाजरे, राजेंद्र दाते पाटील, चंद्रकांत भराड, शरद देशमुख, माऊली कदम, संदीप ताडगे, सदाशिव भुतेकर, योगेश पाटील, राम कुऱ्हाडे, पंकज जऱ्हाड, राम सावंत, रमेश गजर, कृष्णा पडुळ, प्रा. नवलकर, प्रा. नरसिंग पवार, किरण गरड, प्रा. राजेंद्र भोसले, भरत मानकर, सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर ताकट, युवराज सुर्यवंशी, संजय काळे, विनेदकुमार देशमुख, डॉ. प्रशांत जिगे, राजेंद्र गेोरे, चंद्रसेन कोठावळे, सखाराम बोडखे, बालासाहब कदम, ॲड. शैलेश देशमुख, विकास पाटील, योगेश बहादुर, बालाजी माने, समाधान खंदारे, दतात्रय कदम, अशोक खानापुर, गणेश लोखंडे, शाम पाटील, प्रताप लहाने, डवळे पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश वाकडे आदींनी केले आहे.

Previous articleश्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रातोळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन …
Next articleपत्रकारांवरील बेकायदा गुन्हे दाखल केलेले तात्काळ रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू : वसंत मुंडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here