Home Breaking News IIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी

IIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी

131
0

🛑 IIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, ९ जून : ⭕ जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या नियमात काहीशी शिथिलता आणत पुन्हा लॉकडाऊननंतर देश हळूहळू अनलॉक होऊ लागला आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका संपला असे पुर्णतः म्हणता येणार नाही. अनेक दिवसांपासून घरात अडकून असलेली लोक अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसताय.

कोरोना व्हायरसशी लक्षणं अनेकांमध्ये दिसत नसल्याने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दी होणाऱ्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते, अनेक रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नसल्याने आता अशा परिस्थिती कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवणे हे एक आव्हानच आहे.

असा आहे कोरोना रुग्णाला शोधणारा ड्रोन :-

➡️ हैदराबादमधील आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी इंफ्रारेड कॅमेरा असलेला ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची तपासणी करू शकेल.

➡️ या ड्रोनमध्ये एक लाऊडस्पीकरही लावण्यात आला असून ज्याच्या शरीराचं तापमान जास्त असेल त्याला गर्दीतून शोधण्याचे काम हा ड्रोन करतो.

➡️ लाऊडस्पीकच्या मदतीने त्या व्यक्तीला थांबवण्याची किंवा गर्दीतून बाजूला होण्याची सूचना देता येते.

मिळालेल्या माहितीनुसार, थर्मल स्क्रिनिंगसाठी एअरबोर्न इन्फ्रारेड कॅमेऱ्याची विविध प्रकारे चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. या ड्रोनमार्फत होणाऱ्या थर्मल स्क्रिनिंगचा फायदा म्हणजे एका-एका व्यक्तीची तपासणी करण्याची गरज नाही. गर्दीतही ताप असलेल्या व्यक्तीला ओळखून त्याची कोरोना टेस्ट करता येऊ शकते, असे मारुत ड्रोनच्या सीईओंनी सांगितले.

यासह कंपनीने असाही दावा केला की, अनलॉकच्या कालावधीतही कोविड-19 वर नियंत्रण ठेवण्यात एयरबोर्न थर्मल स्क्रिंनिंगची मदत होणार असून लॉकडाऊनमध्ये हैदराबाद आणि करीमनगर पोलिसांनी या ड्रोनचा वापर केला असल्याचे ही सांगण्यात आले आहे.⭕

Previous articleधक्कादायक” नांदेडात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण तर ३ रूग्णबरे होऊन घरी परतले
Next articleरत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here