• Home
  • धक्कादायक” नांदेडात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण तर ३ रूग्णबरे होऊन घरी परतले

धक्कादायक” नांदेडात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण तर ३ रूग्णबरे होऊन घरी परतले

*धक्कादायक” नांदेडात आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण तर ३ रूग्णबरे होऊन घरी परतले*
*नांदेड, दि ९ ; राजेश एन भांगे*
नांदेड जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 9 जून 2020 रोजी मुखेड कोविड केअर सेंटर येथील 2 रुग्ण व पंजाब भवन यात्रीनिवास नांदेड येथील 1 रुग्ण असे एकूण 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

मंगळवारी 9 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 30 अहवालापैकी 29 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. व एका रुग्णाचा स्वॉब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉसिटीव्ह रुग्ण संख्या आता 193 एवढी झाली आहे.

आज प्राप्त झालेला 1 पॉझिटिव्ह रुग्ण हा पुरुष असून वय वर्षे 41 राहणार शाहूनगर नांदेड या परिसरातील आहे सध्या स्थिती त्याची प्रकृती स्थिर आहे.

सदरील पॉझिटिव्ह रुग्ण हा सामान्य रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट असून तो औरंगाबादच्या टेक्निशियनशी नांदेडच्या सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन बसविताना संसर्ग बाधित झाल्याची सूत्रांच्या हवाल्यातून माहिती आहे.
आज सापडलेल्या डॉक्टर रुग्णासह शहरातील तिसरा आणि जिल्ह्यातील चौथा डॉक्टर बाधित रुग्ण असल्याची चर्चा आहे. या अगोदर मुखेड, विवेक नगर, देगलुर नाका आणि आज शाहू नगर अशा चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आत्तापर्यंत 193 रुग्णांपैकी 134 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 50 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांपैकी एक स्त्री रुग्ण वय वर्षे 65 आणि 2 पुरुष ज्यांचे वय वर्ष 65 व 74 वर्षे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.

दिनांक 9 जून 2020 रोजी 69 तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात एका पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 193 वर.

☑️ आत्तापर्यंत 134 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️9 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️50 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment