*युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर*
*मुंबई ,(साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-* युवा मराठा प्रिंन्टमिडीया पासून सुरु झालेला पत्रकारितेचा प्रवास आजच्या आधुनिक तंत्रयुगात अधिकअधिक दर्शकांपर्यत पोहचविण्याच्या दृढ उद्देशाने युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात भेटी देऊन युवा मराठा न्युज चँनल जास्तीत जास्त ठिकाणी सँटेलाईट टि.व्ही.वर दाखविण्यासाठी या दौऱ्यात नियोजन करण्यात येणार आहे.त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार निवडी व जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.युवा मराठा न्युज चँनल व आँनलाईन वेब न्युज पोर्टलने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर आपला नावलौकिक वाढविला असून,महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात आज प्रतिनिधी ,ब्युरो चीफ,व ग्रामीण वार्ताहर जोडण्याची शृंघला युवा मराठा न्युजने आखलेली असून त्या अनुषंगाने हा दौरा पार पडणार आहे.
