• Home
  • खासदारांच्या पगाराला तिस टक्के* *कपात*

खासदारांच्या पगाराला तिस टक्के* *कपात*

*खासदारांच्या पगाराला तिस टक्के* *कपात*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

देशभरातील कोरोनाचे कारण पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी अखेर संसद सदस्यांच्या वेतनावर तीस टक्क्यांची कात्री चालवलीच.
लोकसभेत यासंदर्भातले विधेयक यापूर्वीच मंजूर झाले होते. राज्यसभेने आज त्यावर आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे खासदारांना तीस टक्के कमी वेतन आणि दोन वर्षे खासदार निधीविना सार्वजनिक जीवनात काम करावे लागणार आहे.
संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी राज्यसभेत संसद सदस्य वेतन भत्ते व दुरुस्ती विधेयक मांडले व ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांची एकूण खासदारांची संख्या 780 असून तीस टक्के वेतन कपातीमुळे प्रति महिना 2 कोटी 34 लाखांची बचत होणार आहे.

anews Banner

Leave A Comment