Home उतर महाराष्ट्र देवळाली प्रवरा येथे बिबटया चा धुमाकूळ नागरिक भयभीत ..?

देवळाली प्रवरा येथे बिबटया चा धुमाकूळ नागरिक भयभीत ..?

191
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळाली प्रवरा येथे बिबटया चा धुमाकूळ नागरिक भयभीत ..? अहमदनगर, (प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे बिबट्या ने धुमाकूळ घातला आहे, देवळाली प्रवरा हा परिसर पाण्याचा भाग असल्या कारणाने या ठिकाणी शेती चांगल्या प्रमाणात पिकत असून त्यातल्या त्यात उसाचे पीक हे सर्वच शेतकरी घेत असल्या मुळे बिबट्या दिवस भर उसाच्या शेतात लपून बसतो व रात्रीच्या वेळी मात्र बाहेर निघून दिसेल ते हेरतो व त्यावर ताव मारतो, मग शेळ्या ,बकऱ्या, मेंढ्या, माणसे ,लहान मुले जे त्याच्या कचाट्यात सापडेल त्या वर तो ताव मारतो आहे, या आठवड्यात बिबट्या ने रात्रीच्या वेळी संधी साधून अनेक शेळ्या बकऱ्यांचा बळी घेतला आहे, बिबटयाच्या भीतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे, बिबट्या च्या भीतीमुळे जीव मुठीत धरून बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, वेळीच या हिंस्र प्राण्याला आवर घातला नाही तर किती प्रमाणात निष्पाप जीवांचा बळी जाईल ,याची कल्पनाच न केलेली बरी, म्हणून वन विभागाने त्वरीत लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देवळाली प्रवरा च्या नागरिकांमधून करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here