Home नाशिक लासलगाव भाजपा मंडळातील 76 राम भक्तांचा आयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न—-

लासलगाव भाजपा मंडळातील 76 राम भक्तांचा आयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न—-

146
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_085520.jpg

लासलगाव भाजपा मंडळातील 76 राम भक्तांचा आयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न—-

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

प्रभू श्री रामाचा जन्म अभिजीत मुहूर्त, मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांच्या संगमावर झाला होता. हे सर्व योग २२ जानेवारी २०२४ ला पुन्हा एकदा एकत्र आले आणि जगभरातील हिंदुत्व रामल्ललाची जणू भक्तिमय लाट उसळली. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हरी म्हणजेच विष्णू मुहूर्त आहे, जो ४१ वर्षांनी आला होता. याशिवाय त्या दिवशी सूर्योदयापासून दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग ही होता. अतिशय मंगलमय वातावरणात 500 वर्षाचा वनवास संपवत प्रभू श्रीराम आपल्या हक्काच्या घरात विराजमान झाले. भारताचे लाडके कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांनी संकल्प केलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि देशभरातील रोज चे लाखो भक्तगण अयोध्या धाम दर्शनाला जाऊ लागले. आपली सामाजिक जबाबदारी ओळखत भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या नेतृत्वात तर भाजपा लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश जी सालकाडे, सरचिटणीस निलेश जी जगताप यांच्या आयोजनात लासलगाव भाजपा मंडलातील जवळपास 76 रामभक्त यांचा अयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न झाला. विविध भागांतील पदाधिकारी यात सक्रिय सहभागी होते. येवला मंडल जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, महिला चिटणीस मनीषा कुलकर्णी, लासलगाव मंडल पियुष बंब व इतर पदाधिकारी व रामभक्त दौऱ्यात सहभागी झाले.

Previous articleजि प गट विंचूर येथील ब्राह्मणगाव येथे शक्ती वंदन कार्यक्रम संपन्न—
Next articleपिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा अवलिया कलाशिक्षक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here