Home नाशिक पिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा अवलिया कलाशिक्षक

पिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा अवलिया कलाशिक्षक

144

आशाताई बच्छाव

IMG_20240302_085822.jpg

पिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा अवलिया कलाशिक्षक

चांदवड विद्यालयातील कलाशिक्षक एस एन पाटील यांची कलाकृती

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

चांदवड येथील श्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक एस. एन. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटून अनोखी मानवंदना दिली.
जिद्द सहज चिकाटी व आपल्या कडे असलेल्या उपजत कलागुणांना वाव देत अतिशय मनमोहक पद्धतीचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रपट पानावर काढून त्यांनी आपल्यात असलेले कला गुण सादर केले आहे.
पाटील सर यांच्या या कलेचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कौतुक होत असुन कलाशिक्षक पाटील यांनी पिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची अत्यंत सुबक व नयनरम्य प्रतिमा रेखाटली. विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे ,पर्यवेक्षक प्रकाश आहेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी पाटील सरांचे अभिनंदन केले .

Previous articleलासलगाव भाजपा मंडळातील 76 राम भक्तांचा आयोध्या धाम दर्शन दौरा संपन्न—-
Next articleजिजामाता उद्यानातील मूर्तींना महाशिवरात्री निमित्त रंगरंगोटी करावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.