Home बीड जिजामाता उद्यानातील मूर्तींना महाशिवरात्री निमित्त रंगरंगोटी करावी

जिजामाता उद्यानातील मूर्तींना महाशिवरात्री निमित्त रंगरंगोटी करावी

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_080931.jpg

जिजामाता उद्यानातील मूर्तींना महाशिवरात्री निमित्त रंगरंगोटी करावी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

 

बीड/परळी दि: ०२  महाशिवरात्री उत्सवनिमित्त परळी शहरातील जिजामाता उद्यान येथील प्रभू श्री. महादेव व माँसाहेब जिजामाता मूर्तींना महाशिवरात्री उत्सवनिमित्त रंगरंगोटी करून परिसर सुशोभित करावा अशी मागणी जिजामाता गार्डन हेल्थ क्लब व शिवभक्तांनी परळी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत नगर परिषदेस दिलेल्या निवेदनास म्हटले आहे की, महाशिवरात्रि उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून परळी शहरातील एकमेव जिजामाता गार्डन असून येते प्रभू श्री. महादेव व माँसाहेब जिजामाता यांची पूर्णाकृती मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींचा रंग गेल्या दोन वर्षापासून मूर्तींना रंग न दिल्याने पुसट झाला आहे. महाशिवरात्री असल्याने बाहेरगावाहुन येणारे लाखो भाविक गार्डनला भेट देत असतात. त्यामुळे परळी नगर परिषदेने लवकरात लवकर दोन्ही मूर्तींना रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ व सुशोभित करावा. अशीही मागणी या निवेदनाद्वारे जिजामाता गार्डन हेल्थ क्लबचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य तसेच तमाम शिवभक्तांनी केली आहे.

Previous articleपिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा अवलिया कलाशिक्षक
Next articleआजच्या मॉडर्न युगात युवतींनी सजग राहावे- ॲड. महेंद्र गोस्वामी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here