• Home
  • नांदेड शहरत झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात तर दोघे फरार ; पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नांदेड शहरत झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात तर दोघे फरार ; पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नांदेड शहरत झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात तर दोघे फरार ; पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नांदेड,दि.६ ; राजेश एन भांगे

नांदेड शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या जुना मोंढा या ठिकाणी गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या सहा पैकी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.

रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास जुना मोंढा भागातील तारासिंग मार्केटमधील दुकानदारांना गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करून लुटण्याची घटना घडली होती. रंजीत तारासिंग मार्केट मधील टेक्स्टाईल दुकाना मध्ये घुसून गल्ल्यातील दहा हजार रुपये काढून सहा आरोपी पसार झाले होते.
गुंडांनी केलेल्या या गोळीबारमध्ये पानपट्टी चालक हा जखमी झाला होता. या गोळीबाराच्या घटनेमुळे नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आणि शहरात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली होती.

सदर घटनेमुळे नांदेड शहर पोलिसांपुढे गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक करणे हे एक मोठे आव्हान होते. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, श्री. चिखलीकर, श्री. साहेबराव नरवाडे, श्री शिवले यांनी घटनास्थळावर तत्परतेने धाव घेतली. व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस स्टेशन इतवारा वजीराबादचे गुन्हे शोध पथके (DB) तयार करून विविध ठिकाणी पाठवून तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस यंत्रणेकडून तातडीने कार्यवाही सुरू करत या भागातील वेगवेगळया दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत अवघ्या काही तासातच रात्रीतूनच काही संशयितांना ताब्यात घेतले होते.

सदर घटनेच्या अनुषंगाने इतवारा पोलीस स्टेशन येथे ३१५/२०२० नुसार कालम ३९५,३९७ भांदवीसह ३,४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास साहेबराव नरवाडे हे करत आहेत.

या घटनेतील चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेऊन वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आणखी दोन आरोपींचा शोध सुरु आहे, असे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले आहे. पकडलेले आरोपी हे नांदेड शहरातील असून ते जुन्याच गँगमधील असल्याची शहरात चर्चा आहे.

anews Banner

Leave A Comment