• Home
  • *मास्क नाही , सोशल डिस्टन नाही, तर गँस पेट्राल,डिझेलही मिळणार नाही*

*मास्क नाही , सोशल डिस्टन नाही, तर गँस पेट्राल,डिझेलही मिळणार नाही*

*मास्क नाही , सोशल डिस्टन नाही, तर गँस पेट्राल,डिझेलही मिळणार नाही*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी
‘ ही मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही ही मोहीम राबवली जात आहे.
त्यानुसार “मास्क नाही- प्रवेश नाही’ तसेच “सोशल डिस्टन नसेल तर पेट्रोल- डिझेल- गॅस वितरणही नाही’ ही मोहीम राबविण्यात येईल.
मोहिमेत प्रत्येक सिलिंडरवर, पेट्रोल पंपावरील वाहनांवर जनजागृतीचे स्टीकर चिटकविण्यात यावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधित कंपन्यांना दिले आहे.
जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रामार्फत ग्राहकांना सेवा पुरविल्या जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेवा मिळविण्यासाठी नागरिकांची ये-जा सुरू असते.
या पार्श्वभूमीवर शासनाची
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी”
या मोहिमेत आपण व संबंधित वितरक सहभागी होऊन जाणीव जागृती करावी, अशी सूचना थोरात गॅस एजन्सी, रामकृष्ण इंडेन, पाटील गॅस एजन्सी, रिलायन्स पेट्रोल व एस्सार पेट्रोल या पेट्रोल व गॅस एजन्सींना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रांच्या ठिकाणी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ व “मास्क नाही, प्रवेश नाही’, सोशल डिस्टन नसेल तर पेट्रोल/ डिझेल/ गॅस वितरणही करू नये. दर्शनी भागात 10 बाय 15 फुटांचे मोठे फलक लावावेत, पंपावर ठिकठिकाणी स्टीकर चिकटविणे व मास्क नसल्यास प्रवेश न देण्याचे बंधनकारक करावे, तसेच सोशल डिस्टन नसेल तर सेवा किंवा वस्तूचे वितरणही करू नये, याबाबत सूचना द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.

anews Banner

Leave A Comment