Home बुलढाणा नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

170

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0052.jpg

नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बुलढाणा
संग्रामपुर :-तालुक्यात राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे.
वान नदी पात्र : कोट्यवधीचा महसूल पाण्यात, जनता त्रस्त व प्रशासन मस्त अशी अवस्था आहे . संग्रामपुर तहसिलदार मात्र महाभारतातील धूर्तराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत.
वान नदी पात्रातून पुन्हा रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाचा येथे आशिर्वाद आहे. राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. रेती उपसा सुरु प्रकरणी दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
संग्रामपुर तालुक्यातील रेती घाटांतून अवैध नियमबाह्य रेतीची चोरी करणे सुरु आहे.नदी पात्रात ट्रॅक्टर घालून मजूरांच्या माध्यमातून रेती नदीकाठावर डम्पींग केली जाते. त्यानंतर ती जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरली जाते. दररोज राजरोषपणे अवैध रेतीचे ट्रक नदीघाटावरुन रवाना होत आहे. महसूल प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक रेतीचा उपसा करुन रेतीची विल्हेवाट लावण्यात रेती तस्कर यशस्वी झाले आहेत. रेती तस्करांनीही काही ट्रॅक्टर या कामात लावले आहेत. नदी काठावर जेसीबी येथे ठेवली आहे. जेसीबीने ट्रकमध्ये रेती भरली जाते. सर्रास रेती चोरी सतत सुरु असतांना महसूल प्रशासनाकडून आतापर्यंत चौकशी झाली नाही. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनीही यासंदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नाही. येथील रेती उपसा दबावतंत्र की अर्थकारणामुळे सुरु आहे हा संशोधनाचा विषय आहे.रेती उपसा व चोरी संदर्भात अनेक कडक नियम आहेत परंतु कारवाई होत नाही. पर्यावरणाला नुकसान पोहचत आहे. नदी घाट बचावाकरीता कुणीच वाली नाही. पर्यावरण प्रेमीही येथे समोर येत नाही. नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे. केवळ उंटावरुन शेळया हाकण्याचा प्रकार येथे सुरु आहे. गुणवत्ता प्राप्त व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे. रेतीची सर्रास चोरी होत असतांना महसूल प्रशासनाने संग्रामपुर तालुक्यात एकालाही आर्थिक दंड प्रकरणाची कारवाई केली नाही, हे विशेष.
रेती वाहतूक ठरत आहे वानखेड गावासाठी डोकेदुखी, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नदीवरील रेती वाहतूक गाववासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गावापासून एक किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. गावकऱ्यांना नदीवर जाण्यासाठी असलेल्या हाच एकमेव मार्ग आहे. त्याशिवाय स्मशानभूमी व शेतकऱ्यांना जाण्यासाठी, गुरांना चारण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो.परंतू रेती वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावरून दिवसभर ट्राक्टरची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले आहेत. या रस्त्याने दुचाकीने व पायदळ जाणे सुद्धा शक्य नाही. गावकऱ्यांच्या तक्रारी मुळे मुरुम टाकन्याचे प्रयत्न केल्या गेले. पण पावसाळ्यात मुरूमवावरून ट्राक्टर गेल्याने रस्त्याने चालने‌ अशक्य झाले आहे.
मागील काही दिवसांपासून गावातून भरधाव वेगाने ओव्हरलोड भरलेल्या ट्राक्टर धावत असून गावातील रस्त्यांवर रेतीचे थर जमा होवून अपघातास आमंत्रण मिळत आहे. त्यामूळे गावकरी त्रस्त असून संबंधित अधिकाऱ्यांचे सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहे.

Previous articleलांजेडा, इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
Next articleप्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.