Home पुणे प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न

प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न

166

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0070.jpg

प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न
पिंपरी प्रतिनिधि उमेश पाटील
पिंपळे गुरव मोरया पार्क येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिलांचे नवीन स्वयंपाकघराचे नूतनीकरणाचे उद्घाटन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते पूजन करून व रिबीन कापून झाले.
तसेच त्या प्रसंगी प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप या म्हणाल्या की महिला सक्षमीकरण करण्यासाठी आमचे महिला प्रतिष्ठान कित्येक वर्षापासून काम करीत आहे या कामामधून आम्ही महिलांसाठी नवनवीन रोजगार निर्माण करीत आहोत
या कामांमुळे महिलांना आपल्या पायावरती उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत
त्यावेळी माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप,माऊलीशेठ जगताप,शशिकांत कदम,सागर आंघोळकर, संजय जगताप,नवनाथ जांभुळकर,संजय मराठे,सोपान तात्या जांभुळकर,सुनिल देवकर,महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अनिल गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चव्हाण,संगीता ढिकले,कल्पना शिंदे,ज्योती कोळी,सुनिता कुवर,मनीषा हंगरगे,स्वाती गुरव,उज्वला वाघमारे आदी मान्यवर व नागरिक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Previous articleनदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच
Next articleबुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच दौरा जिल्ह्यात विकास कामांना भरपूर निधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.