आशाताई बच्छाव
बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच दौरा जिल्ह्यात विकास कामांना भरपूर निधी
शासकीय निवास नंदनवन येथे
बुलडाणा जिल्ह्यातील असंख्य पदाधीकाऱ्यांच्या नियुक्त्या
युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ.शशिकात खेडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाला व शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा जाहीर केल्यानंतर काल लोकप्रतिनिधी यांनी प्रथमच बुलडाणा जिल्ह्यातील व मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, ता.प्रमुख, शहरप्रमुख यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. व प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील असंख्य आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव, आनंदराव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार आडसूळ, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकात खेडेकर शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, प्रा.बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत व जिल्ह्यातील अनेक शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी पुरुष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






