Home नांदेड पोलीस प्रशासनाकडून आरोपींची शोध मोहिम सुरु

पोलीस प्रशासनाकडून आरोपींची शोध मोहिम सुरु

77
0

राजेंद्र पाटील राऊत

पोलीस प्रशासनाकडून आरोपींची शोध मोहिम सुरु
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल नांदेड मधील गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्लाबोल मिरवणुकीत पोलिसावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 400 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून आरोग्याची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना covid-19 चे प्रमाण नांदेड जिल्ह्यात भयंकर प्रमाणात वाढल्यामुळे हल्लाबोल मिरवणुकीची परवानगी नाकारण्यात आली होती. हल्लाबोल मिरवणुकीची परवानगी नाकारल्यामुळे सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हातात नंग्या तलवारी घेऊन बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये सात पोलिस कर्मचारी जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरवर्षीप्रमाणे धुलिवंदनाच्या दिवशी शीख समाजाच्या वतीने धार्मिक हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते. परंतु सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना covid-19 प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळे प्रशासनाने गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक हल्लाबोल करावा अशी विनंती केली होती. परंतु काही नवंतरुणांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस तोडून तलवारीने पोलिसावर हल्ला चढविला. तसेच शासकीय गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. धुलिवंदनाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसावर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही. सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. जनतेने कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे साहेब यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here