Home नांदेड नरसीमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

नरसीमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

70
0

राजेंद्र पाटील राऊत

नरसीमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दुः खद निधन झाले. लतादीदींच्या निधनाचे वृत्त समजताच संपुर्ण देश शोकसागरात बुडाला होता. आज नरसी येथील व्यापारी ,डाॅक्टर,व गावक-यांच्या वतीने भारतरत्न, गानकोकीळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

लता मंगेशकर या भारतरत्न होत्या. आपल्या मधुर व गोड आवाजाने त्यांनी कलाक्षेत्रात भारताचे नाव जगात आजरामर केले. गेल्या २९ दिवसांपासुन त्यांच्यावर ब्रीचकॅडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र दि. ६ जानेवारी रोजी त्यांनी उपचार सुरू असतानाच अखेरचा श्वास घेतला. आज दि.७ फेब्रुवारी रोजी नरसी येथे स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी ओड समाजाचे प्रांत सचिव नंदकिशोर नरसीकर टोकलवाड, डाॅ.शिवकुमार जुक्कलकर, डाॅ.संतोष पाटील उच्चेकर, अनिल सावकार श्रीरामवार, विठ्ठल सावकार,अर्जून मेहता,नागेश मेटकर, विलास गोड, गुणवंत पाटील शेळगावकर,संतोष कुडके, संजय वाघमारे,शिवकांत बरडे,उद्धव उमाटे,सचिन कंदूरके,विशनु बडगर,चामुंडा स्वीट , नवाज फुलवाले, सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here