Home नांदेड सावधान स्पीड कंट्रोल — नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर इंटर सॉफ्टवेअर वाहनाद्वारे...

सावधान स्पीड कंट्रोल — नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर इंटर सॉफ्टवेअर वाहनाद्वारे वाहने कॉचिंग जिल्ह्यात पोलीस विभागाची रस्त्यावर करडी नजर

171
0

राजेंद्र पाटील राऊत

सावधान स्पीड कंट्रोल — नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर इंटर सॉफ्टवेअर वाहनाद्वारे वाहने कॉचिंग
जिल्ह्यात पोलीस विभागाची रस्त्यावर करडी नजर
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या रस्त्यावर व जिल्ह्यातील अनेक मार्गावर मोठ्या वेगाने वाहन चालकांनी चारचाकी वाहन तीनचाकी वाहन दुचाकी वाहने सदर चालकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे कसल्याच प्रकारचे काटेकोरपणे कायद्याचे पालन करण्या ऐवजी त्या नियमाचे उल्लंघन करून वाहन स्पीडने चालवित असल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्ह्यात इंटरसॉफ्टवेअर वाहनाच्याद्वारे वाहन धारका कडून दंड आकारला जात असल्यामुळे वाहन धारकानी सावधपणे आपले वाहने कमी स्पीडने चालविने गरजेचे असून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार सावधान स्पीड कंट्रोल इंटर सॉफ्टवेअर वहानाच्या द्वारे पि एस आय शिवानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पॉका महेंद्रसिंग कोठीतीर्थवाले, पॉका अतुल नागरगोजे, पॉका राजेश झुंबाड यांनी मशीनचे नियंत्रन ठेवले असल्यामुळे वाहन धारकानो आता सावधान स्पीडवर ताबा लावा असे सांगण्यात येत आहे

जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर म्हणजे नांदेड ते नरसी चारचाकी वाहनांसाठी ९५ किमी बस ८४ किमी टेम्पो
ट्रक ८४ दुचाकी ७४ किमी तीनचाकी ६३ नांदेड ते
हादगाव चारचाकी ९५ किमी बस ८४ टेम्पो ट्रक ८४ दुचाकी ७४ किमी तीनचाकी ६३ किमी नांदेड ते लोहा चारचाकी ७४ किमी बस ६३किमी ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३, तीन चाकी ५३,नांदेड ते पूर्णा चारचाकी ७४ किमी बस ६३ ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३ तीनचाकी ५३ किमी
नांदेड ते मालेगाव चारचाकी कार ७४, बस ६३, टेम्पो ट्रक ६३, दुचाकी ६३, तीनचाकी ५३ किमी नांदेड ते मुदखेड चारचाकी कार ७४ बस ६३,टेम्पो ६३ दुचाकी ६३, तीनचाकी ५३,भोकर ते किनवट चारचाकी कार ७४,बस ६३ टेम्पो ट्रक ६३, दुचाकी ६३, तीनचाकी ५३,

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह कल्याण टोलनाक्याचा बेजबाबदार पणा वळणावर स्पीड कंट्रोलच्या पाट्याच लावल्या नाही

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या गावाजवळच्या वळणाच्या ठिकाणी धोकादायक असलेले वळणत्या ठिकाणी नावाच्या पाट्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे पोलीस विभागा मार्फत अनेक वेळा पोलीस कंट्रोलचे अधिकारी बोर्ड लावण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असताना ही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोर्ड लावण्यास चालढकल करीत असल्यामुळे व कल्याण टोल नाका यांच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक ठिकाणी स्पीड कंट्रोलच्या पाट्या लावल्या नसल्यामुळे नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्गावर बऱ्याच ठिकाणी अपघात होताना दिसून येत असून सदरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कल्याण टोलनाका यांच्या बेदखल करभारामुळे अपघात वाढण्याची शक्य वर्तविली जात आहे

नरसी ते बिलोली चारचाकी कार ७४ बस ६३, ट्रक टेम्पो ६३, दुचाकी ६३,तीनचाकी ५३,नरसी ते देगलूर चारचाकी ७४ किमी बस ६३ किमी,टेम्पो ६३ किमी, दुचाकी ६३, किमी तीनचाकी ५३ किमी,नरसी ते मुखेड चारचाकी कार ७३ किमी बस ६३,किमी ट्रक टेम्पो ६३, किमी दुचाकी ६३ किमी,तीनचाकी ५३ किमी,नांदेड ते कंधार चारचाकी कार ७४,बस ६३ किमी, ट्रक टेम्पो ६३,दुचाकी ६३ किमी तीन चाकी ५३ किमी अशा प्रकारचा शासनाचा उद्देश असल्यामुळे अपघाताचे ही प्रमाण वाढणार नाही दिलेल्या स्पीडची मर्यादा लक्षात वाहने सावकाश चालविणे गरजेचे असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे

Previous articleनरसीमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
Next articleव-हाणेत सट्टा माफीयाचे थैमान; !! जनता कंगाल सट्टामाफीया मालामाल.!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here