Home पुणे पुणे येथे प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर ‘रयत क्रांती’चा कावड मोर्चा

पुणे येथे प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर ‘रयत क्रांती’चा कावड मोर्चा

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20231206_065038.jpg

पुणे येथे प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर ‘रयत क्रांती’चा कावड मोर्चा
युवा मराठा न्यूज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल नेटवर्क महादेव घोलप

प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर “रयत क्रांती संघटनेचा” आज कावड मोर्चा दुधाचे दर कमी झाल्यामुळे सरकारने लवकरात लवकर मध्यस्थी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी आज मंगळवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कावड मोर्चा धडकला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले,पक्ष प्रदेशाध्यक्ष सागर खोत,राज्य प्रवक्ते प्रा सुहास पाटील,सोलापुर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांचेसह राज्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित कावड मोर्चामध्ये होते.
संपूर्ण राज्यात दुधाचे दर जवळजवळ आठ ते दहा रुपयांनी कमी झाले असून सध्या प्रतिलीटर २६ ते २८ रुपये दर दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे दूध ऊत्पादक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. खासगी व सहकारी दूध संघांच्या मक्तेदारीमुळे दुधाचे दर कमी झाले. सरकारने दूध दर प्रश्नी ताबडतोब मार्ग काढून संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या हेतूने रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे येथे लालमहाल ते प्रादेशिक दुग्ध व्यवसाय कार्यालय पर्यंत कावड मोर्चा काढण्यात आला. मागील जून महिन्यात ३.८/८.५ फॅट व एसएनएफ प्रतीच्या दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये हमीभाव देण्यासंबंधीचा शासन निर्णय झालेला होता. परंतु दूधसंघ त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देत संकलन करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. तसेच भरडा, पशु औषधांच्या वाढलेल्या किमती व वैरणीच्या तुटवड्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यामध्ये लक्ष घालून येत्या १५ दिवसात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलीटर ३४ एवढा हमीभाव रुपये द्यावा, सध्या दूध दर घसरल्याने शेतकऱ्यांना प्रतीलिटर ५ रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी कावड मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.सोलापूर जिल्ह्यातुन पश्चीम महाराष्ट्र सरचिटणीस हणुमंत गिरी, युवा जिल्हाध्यक्ष अमोल वेदपाठक,युवाध्यक्ष नंदु व्यवहारे,पक्ष संपर्कप्रमुख राजकुमार सरडे,माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात,जिल्हा ऊपाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे,राहुल बिडवे,दादासो कळसाईत,अजित घाडगे,पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनिल पाटील,राहुल पवार,पक्ष जिल्हाध्यक्ष संतोष वारगड,रमेश भणगे,पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत काळभोर आदीजन ऊपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवा – आ. अमोल मिटकरी
Next articleविश्वरत्न प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here