Home वाशिम राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवा – आ. अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवा – आ. अमोल मिटकरी

90
0

आशाताई बच्छाव

IMG_20231206_064515.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवा – आ. अमोल मिटकरी
माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी संपूर्ण समाज जोडला गेला पाहिजे व पक्षाचे ध्येय घोरण जनमानसाला अवगत होऊन अजितदादा पवार हे एक विकासात्मक विचारधारा आहे ही बाब प्रत्येकांच्या मनावर बिंबवल्या गेली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
तालुक्यातील ग्राम माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक, पक्षप्रवेश आणि पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम रविवार, ३ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हाजी युसुफ पुंंजाणी हे होते. तर मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, कारंजाचे माजी कृउबा सभापती दत्तराज डहाके, माजी जि.प. सभापती जयकिसन राठोड, जि.प. सदस्य मोहन चौधरी, रा.काँ. च्या पक्षनिरिक्षक सोनालीताई ठाकुर, महिला जिल्हाध्यक्ष सिमाताई सुरुशे, लक्ष्मणराव इंगोले, अशोक परळीकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन अवताडे, वाशिम तालुकाध्यक्ष सुनिल पाटील आखंड, मालेगाव तालुकाध्यक्ष रिंकु पाटील, रिसोड तालुकाध्यक्ष अशोक जाधव, प्रशांत गोळे, आकाश शिंदे, वाशीम तालुकाध्यक्ष सुनिल पाटील अखंड, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष संतोष ठाकरे, मानोरा तालुकाध्यक्ष राजेश नेमाने, कारंजा तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे, काशीबभाई, प्रकाश गांजरे, रिसोड शहराध्यक्ष अरुण क्षिरसागर, वाशिम तालुकाध्यक्ष अर्चनाताई गोटे, माळेगावचे माजी सरपंच रामकृष्ण भोयर, उपसरपंच कृष्णा तागड, गोंडेगावचे सरपंच सोहन डोडवाडे, सावंगाचे सरपंच सुभाष ढोके, खरेदी विक्री संचालक रामभाऊ सोळंके आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांच्या हस्ते आ. अमोल मिटकरी यांचा हार घालुन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध पदावर कार्यकर्त्यांची नियुक्ती करुन त्यांना आ. मिटकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये वाशीम तालुका सचिवपदी लक्ष्मण चव्हाण, तालुका उपाध्यक्षपदी सुधीर कावरखे, पार्डी सर्कल प्रमुखपदी रघुनाथ वाणी, वारा सर्कल प्रमुखपदी पांडूरंग कोरडे, कळंबा सर्कल प्रमुखपदी राजु महल्ले, सहसचिवपदी सावंगा येथील परशराम नालेगावकर यांची नियुक्ती करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. आढावा बैठकीमध्ये आ. अमोल मिटकरीसह, हाजी युसुफ पुंजाणी, दत्तराज डहाके, सोनालीताई ठाकुर व इतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून जिल्हयात राष्ट्रवादीचे पक्ष संगठन वाढवून अजित पवार यांची विकासात्मक विचारधारा घराघरात रुजवावी असे आवाहन केले. आढावा बैठकीचे प्रास्ताविक आकाश शिंदे, सुत्रसंचलन प्रशांत गोळे व उपस्थितांचे आभार असलम पठाण यांनी मानले.

Previous articleनांदगाव शहरात भाजपा ची विजय मिरवणूक संपन्न
Next articleपुणे येथे प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर ‘रयत क्रांती’चा कावड मोर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here