Home वाशिम समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा...

समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

206
0

आशाताई बच्छाव

1000293481.jpg

समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

वाशीम : ( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)

समनक जनता पार्टीचे यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. अकोला येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी सदर पाठिंबा जाहीर केला आहे.

यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. यामध्ये महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख आणि समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांच्यामध्ये तिहेरी लढत राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मतदानाची तारीख जवळ येत असतांना उमेदवार आपापल्या परीने प्रचार कार्य राबवीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय राहील याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. अश्यातच
आज अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यवतमाळ – वाशिम या लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठिंबा हा समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना जाहीर केला आहे.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली राजकीय भूमिका विषद करतांना प्रा. डॉ. अनिल राठोड यांना जाहीर पाठिंबा दर्शविला असून प्रा. डॉ. राठोड यांच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या पाठिंब्यामुळे समनक जनता पार्टी चे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांची ताकत वाढली असून आता खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार राजश्री पाटील आणि समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांच्यात होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे.

Previous articleजळगाव एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी मध्ये स्फोट . आगीचे रौद्र रूप धारण ….
Next articleलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here