Home रत्नागिरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार यांची नियुक्ती

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार यांची नियुक्ती

136

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0021.jpg

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार यांची नियुक्ती                रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण व मुंबई प्रदेश कमिटीचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारींसोबत पनवेल येथील जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्राच्या सभागृहात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक झाली.

बैठकीत कोकण प्रदेश कमिटी अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार, उपाध्यक्षपदी रसिका सारंग. सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी निरीक्षकपदी ॲड सिद्धेश माणगावकर, अध्यक्षपदी प्रणिता कोटकर, उपाध्यक्षपदी
ॲड.भालचंद्र कुलकर्णी, जयदीप बल्लाळ, सदस्यपदी आदित्यकुमार पाटकर, हार्दिक कदम. मुंबई प्रदेश कमिटी- तालुका कमिटी अंधेरी तालुकाध्यक्षपदी ॲड.असीरूल शेख, कुर्ला तालुकाध्यक्षपदी वासिम सय्यद, कुर्ला तालुका उपाध्यक्षपदी शैबाज खान. डोंबिवली तालुकाध्यक्षपदी प्रदीप म्हस्के, कल्याण तालुकाध्यक्षपदी तुषार शिंदे. औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी प्रफूल राणभर यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला ॲड. नागेश पवार, ॲड. सुनिल तोतावड, ॲड. क्रांती अभंगे, डॉ. वसंत राठोड, परेश चौधरी, वाजीद शेख, आकाश वळवी, अतुल उबाळे,ॲड. स्नेहल निकाळे, माधुरी कदम आदी उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.राष्ट्रगीत गायनाने बैठकीची सांगता करण्यात आली.