Home रत्नागिरी घरोघरी तिरंगा या अभियानाने जनमानसात राष्ट्रभक्तीचा सागर उसळतो आहे. तिरंगा फडकवण्यासाठी प्रचंड...

घरोघरी तिरंगा या अभियानाने जनमानसात राष्ट्रभक्तीचा सागर उसळतो आहे. तिरंगा फडकवण्यासाठी प्रचंड आतुरता दिसून येते – ॲड. दीपक पटवर्धन

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0022.jpg

घरोघरी तिरंगा या अभियानाने जनमानसात राष्ट्रभक्तीचा सागर उसळतो आहे. तिरंगा फडकवण्यासाठी प्रचंड आतुरता दिसून येते – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आज घरोघरी तिरंगा अभियानाची सुरुवात घराघरात जाऊन तिरंगा सन्मानपूर्वक प्रदान करून करण्यात आला. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सन्मानाने तिरंगा स्विकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराघरात तिरंगा फडकवण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद दिले.

आपल्याला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याबाबत नागरिक प्रचंड उत्सुक आहेत. ७५ वर्षांपूर्वी प्राप्त झालेले स्वातंत्र्य मौल्यवान असून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या थोर देशभक्त विभूतींच्या आठवणी या अभियानामुळे जनमानसात तीव्रतेने जाग्या होत असल्याचे प्रत्यंतर येते. देशाच्या सार्वभौमत्वेचे प्रतीक असलेला अशोक चक्रांकित तिरंगा लहान थोर सर्वांसाठी प्रिय असून राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला हा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्यासाठी जनमानस कमालीचे आतुर असल्याचा अनुभव तिरंगा प्रदान करताना घरोघरी फिरताना आला असे ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

तिरंगा ध्वजासंदर्भातील ध्वज संहिता शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १३ ऑगस्ट सूर्योदयानंतर तिरंगा आपल्या घरावर, कार्यालयावर फडकवण्याची व १५ ऑगस्ट सूर्यास्तापर्यंत तो न उतरवता तसाच ठेवण्याची मुभा सर्व नागरिकांना प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घरावर तिरंगा फडकवताना तिरंग्यातील भगवा रंग वरच्या बाजूला राहील या पद्धतीने तिरंगा फडकवावा. तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसामुळे तिरंगा भिजला तरी अडचण नाही. मात्र तिरंगा फाटणार नाही, त्यावर डाग पडणार नाही याची उचित काळजी घ्यावी. तसेच तिरंग्यापेक्षा उंच अन्य ध्वज असणार नाही याची काळजी घेऊन तिरंगा फडकवण्याची मुभा आहे.

संपूर्ण शहरातील प्रत्येक घरावर, प्रत्येक आस्थापनेमध्ये दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवलेला असेल हे दृश्य राष्ट्रभक्तीचे विहंगम दृश्य असेल अशी प्रतिक्रिया भाजपा द. जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये घराघरात जाऊन ध्वज प्रदान करण्याचा उपक्रम राजू कीर यांनी आयोजित केला. यावेळी विक्रांत जैन, मोहन पटवर्धन, अतुल लेले, श्री.वैशंपायन, श्री.गोडबोले, शेखर लेले, राजन फाळके, दादा ढेकणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleअमानवी कृत्याने घेतला ‘कृष्णा’चा बळी !
Next articleमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कोंकण प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड.गौरव शेलार यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here