Home नाशिक अमानवी कृत्याने घेतला ‘कृष्णा’चा बळी !

अमानवी कृत्याने घेतला ‘कृष्णा’चा बळी !

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0026.jpg

अमानवी कृत्याने घेतला ‘कृष्णा’चा बळी !

पिपंळगाव बसवंत- सागर कटाळे, युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी
संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल : मोरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मनमोहक अदा, अप्रतिम नृत्याविष्काराने अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या राष्ट्रीय पक्षी कृष्णा मोराचा मानवी कृत्यामुळे अंत झाला आहे. अपहरण कर्त्याने मोरपिसांसाठी कृष्णा मोराची पिसे कापली होती.
मानसाळलेल्या या मोराच्या जोडीला रोज सकाळी ये-जा करणारे नागरिक खाद्य देत असत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी या मोरांचा नृत्याविष्कार अनेकदा पाहिला आहे. बुधवारी (दि. ३) संशयित किरण सोनवणे याने कृष्णाचे अपहरण करून त्याचे पंख छाटून त्याला पुन्हा त्याच वस्तीत सोडले. दुर्दैवाने दोन दिवसाने त्या मोराचा मृत्यू झाला.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी किरण साहेबराव सोनवणे (रा.चिंचखेड ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
पिंपळगाव शहरातील वस्तीवर मोराचे पीस छाटण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून मोरपीस, कात्री हस्तगत करण्यात आली आहे. संशयिताविरोधात वन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– देविदास चौधरी, वनपरिमंडळ अधिकारी, वडनेर भैरव
पिपळगाव बसवंत शिरवाडे वणी येथे मृत मोरावर अत्यसंस्कार करताना वन अधिकारी व पक्षी प्रेमी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here