Home जालना खा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान

खा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान

93

आशाताई बच्छाव

IMG_20240114_183323.jpg

खा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): भारतामध्ये प्रत्येक जागी आपला लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असे सर्वांचे मनोगत  असते, परंतु आपल्या जालना जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी दिवसेंदिवस वरचढ काम केले आणि करत आहेत आणि जनतेला श्वासवती देत आहेत, की निधी अभावी कधीही कामे रडखणार नाहीत, इतके दमदार- हिंमतवाले लोकप्रतिनिधी आपल्याला त्यांच्या रुपाने लाभले आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे की त्यांंना आपण बिनविरोध निवडून द्यावे. ड्रायपोर्टचे रूपांतर मल्टीमॉडेल लॉजिस्ट्कि पार्क मध्ये करण्यात आले आहे. आय सीटी महाविद्यालयासाठी त्यांंनी तब्बल 250 कोटी निधी आणला आहे. जालना हे ऐकमेव शहर आहे की, ज्याला सिमेंट काँक्रिटचा (रिंग रोड) बायपास लाभला आहे. संभाजीनगरमध्ये सिमेंट काँक्रिटचा रिंग रोड नाही.  पण  आपल्या जालन्यामध्ये ना.दानवे यांच्यामुळे सर्व शक्य झाले आहे. ना. दानवे हे पाहिले मंत्री  आहे की ते जनतेला आवाहन करतात की तुम्ही काम सांगा निधी आणण्याचे काम मी करतो असे तेे सांगतात आणि त्यांनी आजपर्यंत त्यांचा शब्द पाळला आहे. भारतामध्ये 56 इंच छातीचे दोनच व्यक्ती दिसू लागले एक मोदी आणि दुसरे रावसाहेब दानवे!
रावसाहेब दानवे यांच्यामुळे जालन्याला काय नाही मिळाले!
रावसाहेब दानवे यांच्यामुळे जालन्याला काय नाही मिळाले. जवळपास सर्व काही मिळाले असून अजूनही जनता त्यांच्याकडून आशावादी आहे. म्हणूनच ते बिनविरोध निवडून यायला हवेत. भाजपाच्या सत्तेच्या काळातच त्यांनी केंद्रीय ंमंत्रीपदाचा त्याग करुन राज्याचे  प्रदेशाध्यक्ष पद सांभाळे. त्यांच्यामुळेच जालन्याला केंद्रात सत्ता मिळाली. लोक पक्ष पाहात नाहीत. तर काम पाहतात.

Previous articleजनता विद्यालयात युवादिन साजरा
Next articleसतीश घाटगे यांच्या प्रयत्नांना यश जनार्दन स्वामी आश्रमात विकास कामास प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.