Home जालना सतीश घाटगे यांच्या प्रयत्नांना यश जनार्दन स्वामी आश्रमात विकास कामास प्रारंभ

सतीश घाटगे यांच्या प्रयत्नांना यश जनार्दन स्वामी आश्रमात विकास कामास प्रारंभ

99

आशाताई बच्छाव

IMG_20240114_184108.jpg

सतीश घाटगे यांच्या प्रयत्नांना यश
जनार्दन स्वामी आश्रमात विकास कामास प्रारंभ

घनसावंगी/जालना,(दिलीप बोंडे ब्यूरो चीफ):- तालुक्यातील रांजणी येथील जनार्दन स्वामी आश्रमातील  मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास रविवारी सुरुवात झाली. प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी प्राप्त झाला.

महामंडेश्वर (राष्ट्रीय महामंत्री जुना आखाडा)शिवगिरी महाराज, कैलास गिरी महाराज , सुनील गिरी महाराज, बालक गिरी महाराज व रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या कामाचे रविवारी  उद्घाटन झाले. रांजणीसह परिसरातील भाविकांचे जनार्दन स्वामी आश्रम हे श्रद्धास्थान आहे. या आश्रमातील मंदिर परिसराचे सुशोभीकरण व्हावे तसेच भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी  गौतम देशमुख, विजय वरखडे, विठ्ठल देशमुख आदींनी सतीश घाटगे यांच्याकडे पाठपुरावा केला. गावकऱ्यांच्या मागणीला प्रतीसाद देत सतीश घाटगे यांनी पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी शासनाकडून निधी मंजुर करुन घेतला. त्यातून प्रत्यक्षात कामाला रविवारी सुरुवात झाली. याप्रसंगी पद्माकर महाराज बोंद्रे, मधुकर देशमुख, सचिन पाटोळे, प्रभाकर देशमुख, प्रीतम वरखडे, शामराव वरखडे, भगवान इंगळे,  सतिष  वरखडे, डॉ. दीपक जाधव,  दत्ता वरखडे, परमेश्वर गारोळे,  रमेश मोरे, महेश देशमुख, पवन हाडे, ज्ञानेश्वर देशमुख,  आदिनाथ वरखडे, संजय हलगे,  कुंडलिक सोलाट, अनिल वरखडे, अंबादास गाढे, रमेश देवकर, आनंद कुहिरे, रामा  गारोळे, हनुमान सोलाट,  दत्ता शीलवंत, प्रभाकर शिंदे,  संभाजी  गाढे, रामेश्वर इंगळे  समस्त भक्ती मंडळ व गावकरी उपस्थित होते.

Previous articleखा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान
Next articleवाशिम जिल्ह्यात प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.