Home वाशिम वाशिम जिल्ह्यात प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप

वाशिम जिल्ह्यात प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240114_184852.jpg

वाशिम जिल्ह्यात प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप

वाशिम तालुका प्रतिनिधी :रितेश गाडेकर

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे प्रभू श्री राम यांच्या अयोध्या मध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप मोठ्या उत्साहात अनसिंग येथे संपूर्ण गावात करण्यात आला. या निमंत्रण व अक्षता वाटप ची सुरुवात गावातील हनुमान मंदिरापासून करण्यात आली. गावातील तरुण मुलांनी व महिलांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका व अक्षता घरोघरी जाऊन दिल्या. टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग गात महिला पुरुष व तरुण मंडळीनी गावात प्रभात फेरी काढली. व जो राम को लायेंगे हम उनको लायेंगे यांचा जयजयकार करण्यात आला. त्या पूर्वी जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या वरून प्रसारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.त्या नुसार गावातील प्रत्येक मंदिरात भजन,कीर्तन, आरती व पाठ पूजा करावी.तसेच प्रसाद वितरण करावे.तसेच सांजवेळेला घरा समोर दिव्याची आरास रोषणाई करावी.हा सोहळा आप आपल्या गावात गल्ली मोहल्यात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा असे आवाहन परीक्षितजी जावळे नागपूर प्रांत सहप्रचारक, मयूरजी निखार वाशिम जिल्हा प्रचारक,योगेशजी मोरे तालुका प्रचारक, मदनजी काळे तालुका कार्यवाह अनसिंग मंडल स्वयंम सेवक ह्यांच्या उपस्थितित पार पाडण्यात आला आहे. या निमंत्रण व अक्षता वाटप कार्यक्रमात सांगितले.या कार्यक्रमात ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Previous articleसतीश घाटगे यांच्या प्रयत्नांना यश जनार्दन स्वामी आश्रमात विकास कामास प्रारंभ
Next articleउपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here