Home भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण

465
0

आशाताई बच्छाव

IMG_20240114_185521.jpg

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण

जितेंद्र आग्रोया यांचा पत्रपरिषदे मधून आरोप .

 

संजीव भांबोरे
– भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) तुमसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एका अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या सांगण्यावरून जितेंद्र आग्रोया या व्यक्तीला दिनांक २ जानेवारी ला कार्यालयात बोलावले होते. मात्र काही कारणास्तव आग्रोया कार्यालयात येऊ शकले नाही नंतर आग्रोया हे ता.१० जानेवारी रोजी ४ ते ४.३० च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना कोणतेही प्रश्न नं विचारता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आग्रोया यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून गालावर तीन- चार झापड मारले व तू आपल्या मुलाला मद्य प्राशन करण्यास बळजबरी करतोस असे म्हणाले व मोबाईल हस्तगत केला.अशी वागणूक उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव यांनी केले असल्याचा आरोप जितेंद्र आग्रोया यांनी पत्रकार परिषदेत करत संबधित दोषी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी आग्रोया यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या लेखी तक्रारी विषयी सदर माहीती पत्रकार परिषेदेतुन दिली.

प्रकरण असे कि,आग्रोया यांचे ,कौंटुबिक, पारिवारिक वादाचे प्रकरन न्यायालयात न्यायाधीन असून या प्रकरणासंबंधित आग्रोया यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कार्यालयात बोलावुन दिनांक १० जानेवारी रोजी अर्जदाराला बंद खोलीत काहीच नं विचारता अश्लील शिवीगाळ करत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गालावर मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन हिसकावून फोन मधील बँकिंग ऍप्स से पासवर्ड विचारण्यात आले व त्यांचा मोबाईल त्यांच्या मुलीला देण्यात आले आणि त्यांना आपल्या मुलीची माफी मांग असे बोलण्यात आले व जर माफी मागणार नाही तर तुला कोणत्याही प्रकारणात फसवून तुला मुख्यमंत्री सुद्धा वाचवणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांनी धमकी दिली.त्यानंतर त्यांना धक्के मारत कार्यालयांच्या बाहेर काढण्यात आले. नंतर आग्रोया यांनी आपल्या भावाला फोन करून सर्व आपबिती सांगितली त्याच्या भावाने त्याला दवाखान्यात नेले व उपचार केला या प्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात धाव घेतली व सर्व प्रकार सांगितला त्याचा बयान पोलिसांनी घेतला असल्याचे आग्रोया यांनी सांगितले.त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आग्रोया यांचा मोबाईल हिसकावून व पासवर्ड विचारून तक्रार दाराच्या बॅक आफ बडोदाच्या खात्यातुन सात हजार सातशे रूपये व युनियन बँक खात्यातुन डेबिट झाल्याचे पत्रकार परिषदेतुन माहीती दिली.

त्यानतर तक्रारदारांनी पोलीस अधिक्षक भंडारा यांना लेखी तक्रार करत व संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.त्यावेळी पत्रकार परिषदेत तक्रारदाराचे भाऊ धर्मेंद्र आग्रोया, मुलगा ओम आग्रोया,निरंजन प्रजापती, भुपेंद्र लांजेवार,प्रमोद तितिरमारे,आदी उपस्थित होते.

 

——–@——–

संबंधितानी लावलेले सर्व आरोप खोटे आहेत.त्यांचा कौटुंबिक वाद आहे.मोबाईल त्यांच्या मुलीकडेच आहे. संबंधिताच्या मुलीने मला फोन द्वारे संपर्क करून तिच्या वडिलाने तिचे इन्स्ट्राग्राम फेक प्रोफाइल तयार केल्याची तक्रार केली होती.

-रश्मीता राव
उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर

——@———

माझ्या वडीलापासून मला कोणताही त्रास नसून मला त्यांनी कोणताही मद्य प्राशन केलेला नाही
-ओम आग्रोया (मुलगा )

Previous articleवाशिम जिल्ह्यात प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप
Next articleतालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here