Home जळगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत

तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत

111

आशाताई बच्छाव

IMG_20240114_191235.jpg

जि.प उच्च प्राथ.शाळा ओझर येथे
तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत
राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस ” संपन्न
ओझर ,चाळीसगाव,( प्रतिनिधि विजय पाटील):- येथील जि. प. उच्च प्राथ.शाळा ओझर येथे दि:११ I१ I२०२४ रोजी ठिक-२ : वाजता शाळेत तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघातर्फ राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस संपन्न झाला . यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती श्री एन के वाळके साहेब अध्यक्षस्थानी होते . त्यांनी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती व Protection to good Samaritans बद्दल अनमोल मार्गदर्शन केले . त्यांनी विदयार्थ्यामंध्ये हसतखेळत आंतरक्रिया घडवून आणली . मुलांना प्रश्न विचारून प्रज्ञावान विदयार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसेही दिले. मुले ही राष्ट्राची संपत्ती असून गुन्हेगारी वृत्तीकडे न जाता संस्कारक्षम विदयार्थी घडावे या बदल सुरेख माहिती दिली .यानंतर शीघ्रकवी रमेश पोतदार यांनी आपली प्रबोधनपर कविता सादर करून वाहवा मिळवली .पो.कॉन्स्टेबल आबा वाघ व दिपक पाटील यांनी रस्ता सुरक्षा व रहदारीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले .यावेळी पर्यावरण मित्र शालिग्राम निकम निर्मित” पर्यावरण साहित्य प्रदर्शन ” भरविण्यात आले. त्या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन न्यायाधीश एन.के. वाळके साहेबांनी करून, त्यांनी त्यांचे तोंडभरून कौतूकही केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शालिग्राम निकम यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका छाया पाटील यांनी मानले . यावेळी विचार मंचावर कें प्र जयप्रकाश चौधरी , गावाचे सरपंच सौ पवार ताई , दिपक पवार , देवेश पवार , उपशिक्षक मंदा चव्हाण , धनंजय आमले ,सतिलाल सोनवणे , वंदना पाटील, दिलीप महाजन सर व चेतन गुजर उपस्थित होते .एकंदरीत कार्यक्रम छान सादर झाला .

Previous articleउपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण
Next articleप्रेम प्रकरणातून तरुणीने केली आत्महत्या दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील तई /बु येथील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.