Home नाशिक श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयाच्या संजना खुटे ची विभाग स्तरावरील जीत कुने डो (कराटे)...

श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयाच्या संजना खुटे ची विभाग स्तरावरील जीत कुने डो (कराटे) स्पर्धेसाठी निवड…

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0034.jpg

श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयाच्या संजना खुटे ची विभाग स्तरावरील जीत कुने डो (कराटे) स्पर्धेसाठी निवड…

दैनिक युवा मराठा
चांदवड प्रतिनिधी – लक्ष्मण आवारे

श्रीमती जे. आर.गुंजाळ माध्य.व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयातील अकरावी सायन्स या वर्गातील संजना बाबाजी खुटे ने जिल्हास्तरीय जीत कुने डो (कराटे) स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. दिनांक 22 सप्टेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. संजना बाबाजी खुटे हिने जीत कुने डो (कराटे) स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.या विद्यार्थिनीची विभाग स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच लोणारी क्रीडा संकुल येवला येथे झालेल्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयातील अकरावी सायन्स वर्गातील संस्कृती सुनिल अहिरे हिने ५३ किलो वजन गटात कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व पूजा राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने 46 किलो वजन गटात कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन भाऊ ठाकरे, मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे पर्यवेक्षक प्रकाश आहेर सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले.

Previous articleगौरी ऐवजी जिजाऊ सावित्रीचे पूजन..
Next articleजिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी ! महानगरपालिका शाळेत रात्रशाळा सुरू जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संकल्पना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here