Home नांदेड आटकळी येथील किशोर विद्यालयात निरोप समारंभ उत्साहात साजरा…

आटकळी येथील किशोर विद्यालयात निरोप समारंभ उत्साहात साजरा…

232
0

राजेंद्र पाटील राऊत

आटकळी येथील किशोर विद्यालयात निरोप समारंभ उत्साहात साजरा…
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
अटकळी-येथिल किशोर विद्यालयात जेष्ठ शिक्षक पि.जी.बोडके सर यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा पं. स नायगाव चे उपसभापती प्राचार्य संजय माधवराव पाटील शेळगावकर हे होते. अाद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, मा. अध्यक्ष यांच्या हस्ते बोडके सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उत्तम रुमाले यांनी केले, सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती म्हणाले की, सामाजिक,शैक्षणिक, स्वछता, अस्पृश्यता निर्मुलन क्षेत्रात त्याग करणारे जे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात असे अापले श्रध्दास्थान स्वच्छ गाव-सुंदर गावचे प्रणेते मा. माधवराव पाटील शेळगांव कर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतः ला भाग्यवान समजतो. त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो व पस्तीस वर्षाची सेवा पूर्ण केली, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून मी अध्यापन करीत राहिलो यात मी पूर्ण समाधानी आहे असे बोडके सर म्हणाले. खेड्यातील मुले शिकली पाहिजेत ग्रामविकास म्हणजे चांगले दवाखाने व उत्तम दर्जाच्या शाळा म्हणजे खर्या अर्थाने देशाचा विकास झाला असे म्हणता येइलअसे संजय पाटील शेळगांवकर म्हणाले बोडके सरांच्या सेवाकार्यात शाळेला दिलेले मोठे योगदान संस्था कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले,अापले उर्वरित आयुष्य समाजकार्यात वाहुन घ्यावे, असा संदेश मा. संजय पाटील शेळगांव कर यांनी दिला व भावी जीवन निरोगी व दीर्घायुष्य लाभण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली, कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक बळीराम पाटील जाधव, संभाजी पाटील, मु. अ. दबडे सर, कानवले सर , विभुते सर उपसरपंच डोंगरे सर, शिवाजी डोंगरे, प्रदिप जाधव सर, अफजल, शिवलिंग व अन्य नागरिक उपस्थित होते सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम घेण्यात आला, सुंदर असे सूत्र संचालन मुख्याध्यापक रावसाहेब ताटे सर व अाभार श्री उत्तम रुमाले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here