राजेंद्र पाटील राऊत
आत्ताची मोठ्ठी ब्रेकींग बातमी ….!!
मनमाडजवळ वीज कोसळून पती पत्नी ठार
विसापूर कातरणी भागात हळहळ…!!
मनमाड,( युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज सायंकाळी आलेल्या वादळी वा-यासह बेमोसमी पावसाचा फटका मनमाडजवळील एका दांम्पत्याला बसला असून,त्यांचा वीज अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,आज सायंकाळी आलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसात येवला तालुक्यातील विसापूर कातरणी शिवारात दोघे पती पत्नी पावसात व वादळात सापडल्याने त्यांच्या अंगावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले आहेत.त्यामुळे कातरणी व विसापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसारविसापूर फाटा ,गोरखनगर ता.येवला येथे आज दि.30.04.2021 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता वीज पडून 2 प्रवासी व्यक्ती मयत व 1 महिला जखमी झाली आहे.
1)रमेश संजय गाढे(मयत) वय 45 वर्षे रा.गिरणारे ता.चांदवड
2)हरपालसिंग बच्चनसिंग शिख(मयत) वय 30 रा.कोपरगाव
3)विद्या(सुखप्रित) हरपालसिंग शिख(जखमी) रा .कोपरगाव
जखमीवर उपचार सुरू आहेत.
तसेच
गुजरखेडे ता.येवला येथील सीताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला आहे.
महितीस्तव सविनय सादर.




