• Home
  • अभिनेता किरण कुमार कोरोना पोझिटीव्ह

अभिनेता किरण कुमार कोरोना पोझिटीव्ह

*⭕अभिनेता किरण कुमार कोरोना पोझिटीव्ह*⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- बॉलिवूडमधील काही जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच काही सेलिब्रेटींकडे काम करणा-यांना देखील करोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते किरणकुमार यांना करोनाची लागण झाल्याचे समजते आहे. ही माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सध्या त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

किरण कुमार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. “मी १४ मे रोजी करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आलेल्या रिपोर्टसमध्ये मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नव्हती. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास कोणतीही समस्या मला जाणवत नव्हती. मी पूर्णपणे व्यवस्थित होतो. परंतु तरी मला करोना झाला आहे. त्यामुळे मी घरातच क्वारंटाइन झालो आहे. माझं घर दुमजली असल्यामुळे मला घरात राहण्यास कोणतीच अडचण येत नाहीये”, असं किरण कुमार म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “सध्या माझी प्रकृती ठीक आहे. माझी पत्नी आणि मुलं घराच्या पहिल्या माळ्यावर राहत आहेत, आणि मी टॉप फ्लोअरवर एकटा राहत आहे. मी आता २६ किंवा २७ तारखेला पुन्हा एकदा करोना चाचणी करणार आहे”.तेजाबमधील लोटिया पठाण या खलनायकी भूमिकेमुळे ते चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारल्या. पुढील काळात त्यांनी दूरदर्शनवर अनेक भूमिका साकारल्या आहेत.

किरण कुमार यांच्यापूर्वी कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली होती. यात कनिका कपूर, चित्रपट निर्माते करीम मोरानी, त्यांच्या दोन्ही मुली, अभिनेता पूरब कोहली, फ्रेडी दारुवालाचे वडील, सत्यजीत दुबे यांची आई अशा काही सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.

anews Banner

Leave A Comment