Home अमरावती ज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका,...

ज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, अमरावती श्रेयवादाचि लढाई.

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240129_090223.jpg

ज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, अमरावती श्रेयवादाचि लढाई.
—————
दैनिक युवा मराठा

पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
रस्त्याच्या भूमिपूजन वरून नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपुर रस्त्याची भूमिपूजन खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर या दोन्ही नेत्याकडून करण्यात आले. दोन दिवसाआधीआ. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या रस्त्याचे भूमिपूजन पुन्हा खा. नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाचा लढाई सुरू झाल्याचा पाहायला मिळतोय. यावेळी बोलताना खा. नवनीत राणा यांनी आ. यशोमती ठाकूर यांच्या टीका केली आहे. त्या म्हणाल्या”ज्यांच्या लेकरू त्यानेच बारसं करायला हवा,, उगाच शेजारच्यांनी येऊन बारसा करू नये. त्यावर प्रतिउत्तर देत आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक जवळ आल्याने हीरोइन मटकून राहिले आहे. ज्यांचे लेकरू त्यानेच बारसं करावे असे म्हटल्यावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड आरोपांची फआइलच उघडली आहे .खा. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशान साधत टीका केली. त्यांनी म्हटले की, ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजाऱ्यांनी नाही. ननदबाई आहे त्यांना झेलावेच लागेल. असा टोला देखील नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला. तर तर याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी खा.नवनीत राणा यांच्यावर उलट प्रति उत्तर दिले आहेत,२०२४च्या लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हीरोइन मटकुन राहिली, पण काम नाही अस जोरदार हल्लाबोल आ. यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्प २०२२ते२०२३ अंतर्गत या रस्त्याचे काम करत असल्याचा खासदार नवनीत राणा यांच्या फलकावर आहे तसेच २०२३ते२०२४ अर्थसंकल्पातर्गत या या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा उल्लेख आ. यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे.

Previous articleअपघातात मृत्यू झालेल्या जवानाला शासकीय इतमात अखेरचा निरोप
Next articleखडक माळेगाव येथे गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here