Home नाशिक खडक माळेगाव येथे गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा–

खडक माळेगाव येथे गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा–

297

आशाताई बच्छाव

IMG_20240129_090627.jpg

खडक माळेगाव येथे गोखले इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड (नाशिक) प्रतिनिधी

गोखले एज्युकेशन सोसायटीचे नामदार गोपाळकृष्ण गोखले इंग्लिश मिडीयम स्कूल खडक माळेगाव ता.निफाड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
खडक माळेगाव ता.निफाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे N.G.K.G इंग्लिश मिडीयम स्कूल खडक माळेगाव. निफाड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आवारातील बांधलेल्या नवीन स्टेजचे उद्घघाटन करून करण्यात आली. तसेच ध्वजारोहनासाठी गो.ए.सो. चे झोनल सेक्रेटरी प्रो.डॉ. राम कुलकर्णी सर, अधीक्षक मि. विनोद देशपांडे सर,अतुल जाधव सर,कुणाल महाजन सर खडक माळेगाव येथील सरपंच जगदीश पवार पोलिस पाटील सौ. वैशाली बाजारे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. रेणुका भार्गवे मॅडम, पालक उपाध्यक्ष श्री सचिन क्षिरसागर तसेच इतर पालक,ग्रामस्त, विकास रायते, उत्तम रायते, अशोक रायते,रविन्द शिंदे, बापु काकडे ,पंढरीनाथ रायते, राहुल शिंदे, विकास जेऊघाले, गणेश शिंदे, सोमनाथ भोसले, उत्तम पगार, महेश काकडे,प्रकाश जेऊघाले, रामेश्वर शिंदे, आप्पा राजोळे तसेच महिला पालक जयश्री शिंदे ,ज्योती शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो.डॉ.राम कुलकर्णी सरांच्या हस्ते ध्यजारोहन करण्यात आला. ध्यजारोहनाचा कार्यक्रम झाल्यानंतर हॉलमध्ये अध्यक्ष, अधीक्षक, तसेच प्रमुख पाहुणे, पालक उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुलांनी भाषण व डान्स परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने सादर केले. शिक्षिका कोमल सोनवणे यांनी भाषण दिले व त्यानंतर मान्यवरांनी व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सुरेखा जाधव व आभार प्रदर्शन शिक्षिका मनाली जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिपिक सौ. कीर्ती थेटे मॅडम व इतर स्टाफ मध्ये सौ. स्नेहल क्षिरसागर, कृष्णा जेऊघाले , हरिभाऊ नितनवरे यांनी खूप परिश्रम व मेहनत घेतली व आपले मोलाचे सहकार्य शाळेला दिले.अशाप्रकारे मोठ्या उत्साहात व आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Previous articleज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, अमरावती श्रेयवादाचि लढाई.
Next articleटाकळी विंचूर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन‌ मोठ्या उत्साहात साजरा —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.