Home बीड अपघातात मृत्यू झालेल्या जवानाला शासकीय इतमात अखेरचा निरोप

अपघातात मृत्यू झालेल्या जवानाला शासकीय इतमात अखेरचा निरोप

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240129_085618.jpg

अपघातात मृत्यू झालेल्या जवानाला शासकीय इतमात अखेरचा निरोप

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/पाटोदा दि:२८ जानेवारी २०२४ पाटोदा तालुक्यातील जवळाला येथील सैन्यदलात कार्यरत जवान ज्योतीराम हनुमंत जाधव वय ३५ वर्षे हा किरकोळ सहा दिवसाची सुट्टी घेऊन गावातील धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता २६ जानेवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाला होता. दिनांक २७ जानेवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तालुक्यातील जवळाला येथील सैनिक ज्योतीराम हनुमंत जाधव हे कर्तव्यावर असताना घरच्या देवीच्या देवीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी किरकोळ सहा दिवसाची रजा घेऊन गावी आले होते. ते पाटोदा येथे कामानिमित्त आले होते जेव्हा रात्री १२ वाजता आम्ही उरकून गावाकडे जात असताना बीड-नगर शंभर चिरा येथे खडीचे नादुरुस्त टिपरला मागून दूचाकी जोरदार धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे आज सकाळी पाटोदा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मराठा बटालियनचे आर्मी ऑफिसर, पाटोदा पोलीस प्रशासन, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कर्नल कल्याण डोरले, आ.सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस, माजी सभापती महेंद्र गर्जे, आनंद जाधव, राहुल जाधव, पत्रकार विजय जाधव, हमीद खान पठाण बंटी नलावडे,सुनील कौठेकर, आजी माझी सैनिकांनी व हजारो नागरिकांनी सश्रुनयनाने अखेरचा निरोप दिला.

Previous articleअखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे 26 जानेवारीला अनोख्या पध्दतीने साजरा
Next articleज्यांचं लेकरू त्यानेच बारसं करावं: नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका, अमरावती श्रेयवादाचि लढाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here