Home विदर्भ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_180833.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

यवतमाळ (संजीव भांबोरे )प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने नुकताच निर्मल बंन्सी लॉन नेर येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी नेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल यांनी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पत्रकारांनी पत्रकार म्हणून काम करताना आपले सामाजिक भान व संवेदनशीलतेचा परिचय निश्चितच अधोरेखीत केला पाहिजे. तसेच दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईचे मीडिया हेड विजयकुमार बुंदेला यांनी पत्रकारितेतील नैतिकता व विवेक याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली पत्रकारिता अधिकाधिक पारदर्शक व वास्तवतेचं यथोचित चित्रण करणारी असावी. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नेर नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल यांनी भूषविले तर स्वागत अध्यक्ष म्हणून मानवाधिकार यवतमाळ जिल्हाध्यक्ष मकबूल खान (गामा भाई) यांची उपस्थिती होती.
यावेळी नेर अर्बन महाप्रबंधक प्रदिपभाऊ झाडे, भा.स.संस्था महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उमेशभाऊ मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे नेर शहर अध्यक्ष नसरुल्ला खान, सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसळे, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई पवार, प्रणिती व्यसनमुक्ती दारूबंदीच्या संगीताताई पवार, महिला मोर्चा भाजपाच्या जिल्हाध्यक्षा शिवानीताई गुगलीया, मानवाधिकार उपाध्यक्षा रेणुकाताई जयस्वाल, माजी नगरसेवक नितीन माकोडे, इम्तियाज लकडकुट्टा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष साजिद टिक्की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बंडूभाऊ बोरकर तसेच तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अतिशय आगळ्यावेगळ्या स्वरूपात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव वानखडे, जिल्हा सचिव अविनाश बनसोड, जिल्हा सदस्य सतीश उरकुडे, नेर तालुका अध्यक्ष जीयाउल्ला खान यांचे कल्पकतेने व संकल्पनेतून उत्तम असा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन विर, प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा सचिव अविनाश बनसोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेर तालुका उपाध्यक्ष राहुल मिसळे, सचिव पंकज गुल्हाने, सहसचिव मनीष मेश्राम, कोषाध्यक्ष वसीम मिर्झा, संघटक रवी जयस्वाल, प्रसिद्धीप्रमुख पियुष भोयर, कायदेविषयक सल्लागार ॲड हरीश कठाने, जिल्हा सदस्य अमृत वासनीक, संजय आमटे, साजिद खान आदी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleजनता विद्यालयाला यशोन्नती
Next articleसावित्रीबाई फुले व माता जिजाबाई यांचे विचार समाजात रुजवणे म्हणजे तीळ संक्रांत –शोभा बावनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here