Home उतर महाराष्ट्र राजे शिवरुद्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने धोडप किल्ल्याची स्वच्छता

राजे शिवरुद्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने धोडप किल्ल्याची स्वच्छता

138
0

राजेंद्र पाटील राऊत

राजे शिवरुद्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने धोडप किल्ल्याची स्वच्छता
प्रतिनिधी= किरण अहिरराव

राजे शिवरुद्र प्रतिष्ठान च्या वतीने धोडप किल्ल्यावर दुर्गसंवर्धन व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली
हा किल्ला देवळापासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. दररोज शेकडोच्या संख्येने दुर्गप्रेमी किल्ल्यावर येतात. व त्यामुळे तेथे खूपच कचरा झालेला आहे. किल्याचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी राजे शिवरुद्र सेवा प्रतिष्ठानच्या नाशिक व देवळा शाखेने किल्ल्यावर वृक्ष लागवड व दुर्गसंवर्धन मोहीम राबवली. या अंतर्गत किल्ल्यावर माहिती फलक, सूचना फलक लावण्यात आले. तसेच किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर उचं असा भगवा ध्वज फडकविण्यात आला. परिवाराच्या शिलेदारांनी किल्ल्यावरील पाण्याचे टाके ,कारखाने, पागा अशा सर्व वास्तूंची साफसफाई केली. बुजले गेले टाके मोकळे केले. वाटेतील काटेरी झुडपे व गवत काढून व तसेच दगड बाजूला करून दुर्ग प्रेमींसाठी जाण्यासाठी वाट मोकळी केली. किल्ल्यावर वृक्ष लागवड करण्यात आली. किल्ल्याच्या तटबंदीवर बुरुजांवर उगवलेली झाडे झुडपे तोडून त्यांचे संवर्धन करण्यात आले. किल्ल्यावरील सर्व कचरा गोणीच्या माध्यमातून पायथ्याशी आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
मोहिमेसाठी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते आशिष पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष मनीष लोळगे, खर्डाप्रमुख प्रमुख वैभव यांच्यासहित तालुक्यातील अनेक मावळ्यांनी विशेष मेहनत घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी विशेष मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here