Home विदर्भ सुनील शर्मा यांचे आत्मदहन आंदोलन मागे : 8 दिवसात फिल्टर प्लॅन दुरुस्ती...

सुनील शर्मा यांचे आत्मदहन आंदोलन मागे : 8 दिवसात फिल्टर प्लॅन दुरुस्ती चे नगर पंचायत चे आश्वासन

253
0

राजेंद्र पाटील राऊत

सुनील शर्मा यांचे आत्मदहन आंदोलन मागे
: 8 दिवसात फिल्टर प्लॅन दुरुस्ती चे नगर पंचायत चे आश्वासन

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे :

मालेगांव :- शहरात अतिशय गढूळ पाणी पुरवठा येत होता आणि नागरीकांकडून टॅक्स जास्त आकारला जात होता यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुनील शर्मा यांनी क्रांती दिनी आत्मदहन चा इशारा दिला होता यावर नगर नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी येत्या आठ दिवसात दुरुस्तीचे काम करून ाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिल्यामुळे तूर्तास सुनील शर्मा यांचे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मालेगाव शहरात पस्तीस वर्षापूर्वीची कुरळा धरणावरून असलेली जुनी पाईपलाईन आहे की वारंवार खराब होते सोबतच शहरात कोणत्याही प्रकारचे पाणी फिल्टर केल्या जात नाही आल्यानंतर तसेच ते नागरिकांना दिले जाते मात्र त्या बदल्यात वर्षभराचा बाराशे रुपये टॅक्स प्रत्येक कुटुंबाकडून आकारला जात होता त्यामुळे एक तर टॅक्स कमी करा किंवा शुद्ध पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी सुनील शर्मा यांनी वारंवार निवेदन दिले अखेर ते करण्यासाठी त्यांनी नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता याची दखल घेत नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉक्टर खंडारे यांनी लेखी आश्वासन देऊन आठ दिवसात दुरुस्तीचे काम केल्या जाईल असे सांगितले त्यामुळे सुनील शर्मा यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे शहरात जुनी पाणी पुरवठा योजना असून नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे ती सुद्धा लवकरच कार्यान्वित होईल आहे असेही त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे आता 8 दिवसात काय काम होतं याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleमोराची शिकार करण्याच्या तयारीत असलेले 3 जण ताब्यात
Next articleराजे शिवरुद्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने धोडप किल्ल्याची स्वच्छता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here