Home मुंबई ठाणेकरांची तहान भागणार…! ठाणे महापौर,खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जलकुभांचं लोकार्पण….

ठाणेकरांची तहान भागणार…! ठाणे महापौर,खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जलकुभांचं लोकार्पण….

149
0

राजेंद्र पाटील राऊत

ठाणेकरांची तहान भागणार…! ठाणे महापौर,खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जलकुभांचं लोकार्पण….

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

महापालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यातून वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजनांची कामे मंजूर करुन याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. घोडबंदर रोड परिसरात नव्याने दोन जलकुंभ आणि संप-पंप देखील उभारण्यात आला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस आणि जलकुभांचं आज लोकार्पण झालं.

सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठ्याव्यतिरिक्त प्रतिदिन 12 द.ल.लि प्रतिदिन इतका पाणीपुरवठा या जलकुंभामार्फत होणार आहे. तसेच 15 लक्ष क्षमतेच्या संपमधून 100 अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. सुमारे 29 कि.मी लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या जलकुभांमुळे घोडबंदर रोडवरील प्र.क्र. 1 मधील पाण्याचा प्रश्न सुटणार असून नागरिकांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा होईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा अंतर्गत रिमॉडेलिंगचे काम सुरू आहे.
टप्प्याटप्प्याने महापालिका कार्यक्षेत्रातील इतर विभागातही पाणीपुरवठा मुबलक होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू असल्याचं महापौरांनी सांगितलं. या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असून यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्प‍िटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन, प्लॅटिनम लॉन्स, कॉसमॉस ज्वेल्स, पार्क वुड, युनिक ग्रीन, साईनगर, भक्तीपार्क , ऋतु एन्क्लेव्ह, संघवी हिल्स, ग्रीन स्क्वेअर, ग्रॅण्ड स्क्वेअर सुदर्शन स्काय गार्डन आदी विभागातील 80 हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूकीवरील भार कमी व्हावा या दृष्टीने जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही उपाययोजना करीत आहोत. असे महापौर यांनी सांगितले

Previous articleबंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा – जिल्हाधिकारी पवनीत कौर
Next articleहिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आज नसरापूर येथे आधार कार्ड दुरुस्ती उपक्रम.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here