Home पुणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आज नसरापूर...

हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आज नसरापूर येथे आधार कार्ड दुरुस्ती उपक्रम.

105
0

राजेंद्र पाटील राऊत

हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आज नसरापूर येथे आधार कार्ड दुरुस्ती उपक्रम.
भोर(नसरापूर- जीवन सोनवणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क): हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्ताने आज नसरापूर येथे आधार कार्ड दुरुस्ती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन मा श्री कुलदीप तात्या कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याच प्रमाणे
युवासेना संघटक आदित्य बोरगे यांच्या प्रयत्नातून भारतीय पोस्ट च्या माध्यमातुन आधार कार्ड दुरुस्ती व शासकीय योजना माहिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. सदर उपक्रमाचे भागातील नागरिकांकडून कौतुक होत असून पुढे ही असे उपक्रम राबविले जावे अशी मागणी होत आहे.
आधार कार्डसंदर्भात तक्रारी संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी धावपळ, वेळ आणि पैसा याची बचत व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन आदित्य प्रकाश बोरगे यांनी केले. दोन दिवस हा उपक्रम चालू असून तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आदित्य बोरगे यांनी केली आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधीकारि व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleठाणेकरांची तहान भागणार…! ठाणे महापौर,खासदार राजन विचारे यांच्या हस्ते जलकुभांचं लोकार्पण….
Next articleआळंदी ये थे हरिप्रसाद यात्रा ग्रुपचे आयोजन           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here